कुठल्याही बागेत पाय ठेवणार नाही; छत्रपती संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 02:15 AM2020-01-13T02:15:19+5:302020-01-13T02:15:37+5:30

नागपुरातील रेशीम बागेवरून स्पष्टीकरण

No one will set foot in the garden; Chhatrapati Sambhaji Raje | कुठल्याही बागेत पाय ठेवणार नाही; छत्रपती संभाजीराजे

कुठल्याही बागेत पाय ठेवणार नाही; छत्रपती संभाजीराजे

Next

सिंदखेड राजा (बुलडाणा) : अलीकडील काळात नागपुरातील एका बागेचा (रेशिम बाग) उल्लेख सातत्याने होत आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अमराईत एक चांगली बाग उभारून तेथे जाऊ; परंतु दुसऱ्या कुठल्याही बागेत आपण पाय ठेवणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिला.

४२२ व्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमात मराठा सेवा संघाने खा. संभाजीराजे यांचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मराठा विश्वभूषण हा पुरस्कार मराठा सेवा संघाने आपणास दिला; परंतु आपण पुरस्कारासाठी कधीच काम केले नाही. त्यामुळे हा पुरस्कार का स्वीकारावा, असा प्रश्न आपणास पडला होता; मात्र शिवाजी महाराज आणि शाहु-फुलेंचे विचार आपण जपतो, त्यांच्या विचारावर चालण्याचा आपण प्रयत्न केला. त्यांच्या केवळ रक्ताचा नव्हे, तर विचारांचा वारसा आपण जपत असल्यामुळे हा पुरस्कार स्विकारल्याचे ते म्हणाले. शिव-शाहू दौरा गतकाळात राज्यात आपण पूर्ण केला. त्याचे पूर्ण श्रेय हे मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांना जाते. या माध्यमातूनच आपली खरी ओळख जनमाणसाची झाली आणी महाराष्ट्राची आपली खºया अर्थाने ओळख झाली. त्यामुळे हा पुरस्कार अशा सर्व सामान्य व्यक्तींना समर्पित आहे. सारथी प्रकरणाचा उल्लेख करत संस्थेची स्वायत्तता बाधीत होत असेल तर आपण रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

फोर्ट फेडरेशन स्थापन
गड किल्ल्यांच्या सवंधर्नासाठी आगामी काळात फोर्ड फेडरेशन स्थापन करणार असून, गड किल्ल्यांचा विकास व संर्वधन आपण करणार आहोत. त्या अनुषंगांने पुरातत्व विभागाशी एक एमओयु (मेमोरॅन्डम आॅफ अंडरस्टॅडींग) सुद्धा करणार असल्याचे खा. संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

Web Title: No one will set foot in the garden; Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.