नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:17 PM2018-04-08T12:17:01+5:302018-04-08T12:17:01+5:30

मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील 24 वर्षीय नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्गावर मुंदडा पेट्रोलपंपाजवळ शनिवारी रात्री 8.30 वाजता त्याच्या मोटारसायकलला अपघात झाला होता.

A newly married youngster died in a motorcycle accident | नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार  

नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार  

googlenewsNext

बुलडाणा - मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील 24 वर्षीय नवविवाहित तरुण मोटारसायकल अपघातात ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्गावर मुंदडा पेट्रोलपंपाजवळ शनिवारी रात्री 8.30 वाजता त्याच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. गुढीपाडव्याच्या दिवशीच विवाहबद्ध झालेल्या तरुणाच्या अंगावरील हळद देखील सुकली नसल्याने काळाने त्याच्यावर घाला घातला.  मलकापूर तालुक्यातील बेलाड येथिल शुभम  रामराव संबारे यांची राष्ट्रीय महामार्गाला लागूनच शेती आहे. तर सध्या तो मलकापूर शहरातील बिर्ला कॉलनीत राहतो. शनिवारी रात्री 8.30 वाजता शुभम शेतातून घरी येत असताना अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. या घटनेत शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. धाब्यावरील नागरिकांनी त्यास मलकापूर येथील चोपडे हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते तर डोक्याला जबर मार लागला होता, त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. पुढील उपचारासाठी त्यास बुलढाणा नेत असतानाच त्याचा वाटेतच मृत्यू झाला.  

Web Title: A newly married youngster died in a motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.