बुलडाणा जिल्हयातील पालिका कर्मचारी एक जानेवारीपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 02:19 PM2018-12-29T14:19:27+5:302018-12-29T14:19:29+5:30

नगर पालीका व नगर परिषद कर्मचारी, अधिकारी संघटनेने संपाचा निर्णय घेतला असून १ जानेवारी पासून बेमुदत संपाला प्रारंभ होणार आहे.

Municipal employees of Buldhana district on strike from January 1 | बुलडाणा जिल्हयातील पालिका कर्मचारी एक जानेवारीपासून संपावर

बुलडाणा जिल्हयातील पालिका कर्मचारी एक जानेवारीपासून संपावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पालिका कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकरिता वारंवार संप व आंदोलने करूनही राज्य शासनस्तरावरून पालिका कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. परिणामी, नगर पालीका व नगर परिषद कर्मचारी, अधिकारी संघटनेने संपाचा निर्णय घेतला असून १ जानेवारी पासून बेमुदत संपाला प्रारंभ होणार आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा जिल्हयातील ११ नगरपालिका व २ नगरपंचायतीमधील सर्व संवर्ग कर्मचारी सहभागी होणार आहे. 
मोताळा, संग्रामपुर या दोन ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत  असलेल्या कर्मचाºयांना नगर पंचायतमध्ये समाविष्ट करून घेणे व न.प. कर्मचाºयांचा दर्जा देणे आवश्यक असताना आजपर्यंत कृती करण्यात आली नाही . ती कृती तातडीने व्हावी. न.प.कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्या  पुर्ण कराव्या, १ जाने. २०१६ पासुन विनाअट सातवा वेतन आयोग लागु करावा , रोजंदारी कर्मचारी कायम करणे, २४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी दयावी. कर्मचाºयांचे प्रश्न निकाली काढावे अशा विविध २० मागण्यांकरिता संघटनेअंतर्गत सर्वप्रथम निवेदन देण्यात आली होती, त्या निवेदनामधून १, जानेवारी २०१९ पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय घोषीत करण्यात आला होता. त्यावर राज्य शासनाने कोणतीच दखल घेतली नाही.
१० डिसेंबर १८ रोजी मुंबई येथे नगर विकास राज्य मंत्री मा.रणजित पाटील यांच्यासोबत संघटनेची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही व ठोस निर्णय न झाल्यामुळे न.प. कर्मचारी संघटना आपल्या निर्णयावर ठाम राहिली आहे . 
    (प्रतिनिधी)

 पालिकेच्या अत्यावश्यक सेवा होणार प्रभावित!
यामध्ये न.पच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन आदी विभागाचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने न.प.अंतर्गत पुरविल्या जाणाºया सर्व सेवा प्रभावीत होणार असल्याचे व न.प.कर्मचान्याच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या निकाली निघेपर्यत या संपातून आम्ही माघार घेणार नसल्याचे नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत निळे, व महाराष्ट्र राज्य न.प.कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य  मोहन अहिर यांनी नमूद केले.  सोबतच नागरिकांना होणाºयाअसुविधेबद्दल त्यांनी निवेदनातून क्षमा देखील मागीतली.

Web Title: Municipal employees of Buldhana district on strike from January 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.