महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाच प्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:35 AM2021-03-16T10:35:30+5:302021-03-16T10:35:49+5:30

MSEDCL assistant engineer arrested in bribery case योगेश उदयसिंह भोकन (२८) असे लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.

MSEDCL assistant engineer arrested in bribery case | महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाच प्रकरणी अटक

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाच प्रकरणी अटक

googlenewsNext

बुलडाणा: मुख्यमंत्री सौर शेती पंप योजनेतंर्गत केलेल्या कामाच्या पुर्ततेच्या अहवालावर स्वाक्षरीसाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देऊळगाव राजा  येथील सहाय्यक अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सोमवारी सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.योगेश उदयसिंह भोकन (२८) असे लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. देऊळगाव राजातीलमहावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तो कार्यरत होता. देऊळगाव राजा शहरातीलच भगवानबाबा नगरमध्ये तो राहत होता. मुळचा राहणारा तो मोताळा तालुक्यातील तरोडा येथील आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथील ४९ वर्षीय कंत्राटदार यांनी देऊळगाव राजा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेले योगेश उदयसिंग भोकन (वर्ग २) याने मुख्यमंत्री सौर शेती पंप योजनेतंर्गतच्या कामाच्या पुर्ततेच्या अहवालासाठी दीड हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार केली होती. त्यानुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपविभागीय कार्यालयात लापळा रचला होता. त्यादरम्यान तक्रारकर्त्याकडून पंचासमक्ष प्रती अहवाल ५०० रुपये या प्रमाणे दीड हजार रुपयांची लाच योगेश उदयसिंह भोकन याला घेतांना एसीबीने त्यास रंगेहात पकडले.

ही कारवाई बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, पोलिस शिपाई जगदीश पवार, चालक मधुकर रगड यांनी केली. अमरावती परीक्षेत्राचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड अप्पर पोलिस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी हे करीत आहेत.

Web Title: MSEDCL assistant engineer arrested in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.