वीजचोरांविरूद्ध महावितरणच्या गुरुवारी आकस्मिक धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:27 PM2017-10-13T19:27:14+5:302017-10-13T19:37:54+5:30

वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणची सातत्याने कारवाई सुरूच असून बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुरुवारी १२ ऑक्टोंबर२०१७ रोजी महावितरणच्या पथकाने एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता  आढळून आल्यामुळे एकूण २२८ जणांवर कारवाई करण्यात आली.

MSEDCL against power theft on Thursday | वीजचोरांविरूद्ध महावितरणच्या गुरुवारी आकस्मिक धाडी

वीजचोरांविरूद्ध महावितरणच्या गुरुवारी आकस्मिक धाडी

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यामध्ये २२८ जणांवर कारवाईमोहिमेतील ३७ पथकामध्ये २६१कर्मचा-यांच्या समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणची सातत्याने कारवाई सुरूच असून बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुरुवारी १२ ऑक्टोंबर२०१७ रोजी महावितरणच्या पथकाने एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता  आढळून आल्यामुळे एकूण २२८ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख २४ हजार १३९ वीजयुनिटची म्हणजे जवळपास १४ लाख ५५ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे,    प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या  निर्देशानुसार  अधिक्षक अभियंता जी.एम. कडाळे  यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते  काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये व पांडुरंग पवार यांचेसह जिल्ह्यातील अभियंते व जनमित्र  असलेल्या एकूण ४८ पथकांमध्ये २६१ जणांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. या पथकांनी जिल्ह्यातील सर्वच भागातील विविध वर्गवारीच्या ग्राहकांची तपासणी करण्यात आली.
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-यात जिल्ह्यामध्ये ५२ ग्राहक आढळून आले यामध्ये बुलडाणा विभागातील ३२ तर मलकापूर विभागातील २० ग्राहकांचा समावेश होता. तसेच ज्या गावांमध्ये विद्युत वाहिन्यावर आकोडे/हुक टाकून वीज चोरी करण्यावर पथकानी कारवाई केली,यामध्ये  बुलडाणा विभाग ५३, खामगाव विभाग ७० तर मलकापूर विभाग २० जण आढळले. यांचेवर  भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच जवळपास ८१ ठीकाणचे आकोडे काढण्यात आले तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे ११ ग्राहक आढळून आले त्यांचेवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली. संपूर्ण कारवाईमध्ये १ लाख २४ हजार १३९ वीजयुनिटची म्हणजे जवळपास १४ लाख ५५ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीसुद्धा  जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये अनेक ग्राहकांवर कारवाई करण्यात आली होती . वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामूहिकरीत्या सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता जी.एम. कडाळे यांनी केले आहे.

Web Title: MSEDCL against power theft on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.