होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी मिताली लढ्ढा ची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:01 AM2018-02-10T00:01:40+5:302018-02-10T00:02:04+5:30

बुलडाणा: होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीसाठी मिताली रितेश लढ्ढा या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.

Moti Bhaagha's selection for Homi Bhabha Bal Scientist examination | होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी मिताली लढ्ढा ची निवड

होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी मिताली लढ्ढा ची निवड

Next
ठळक मुद्देमताली सहकार विद्या मंदिर बुलडाणाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीसाठी मिताली रितेश लढ्ढा या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक सहकार विद्या मंदिर बुलडाणाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी मिताली लढ्ढा हिने लेखी परीक्षेत ७४ गुण मिळविले आहेत, तर प्रात्यक्षिक परीक्षेत ४८ गुण मिळविले. मुंबई येथील तिसर्‍या फेरीकरिता तिची तयारी चालू आहे.  
या फेरीसाठी ‘व्हेअर डझ इट गोस’ हा विषय यावर्षी दिला असून, यावर काम करताना तिने बाल कल्पनेनुसार ‘ई-वेस्ट’ हा विषय निवडला आहे. दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक हा ई-टेक्नॉलॉजी आहे; परंतु त्यातून तयार होणारे वेस्टेजचे योग्यरीत्या व्यवस्थापन व्हावे, या हेतूने मितालीने हा विषय आपल्या प्रोजेक्टसाठी घेतला आहे.

Web Title: Moti Bhaagha's selection for Homi Bhabha Bal Scientist examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.