बाजारपेठेत झुंबड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:23 AM2017-10-17T00:23:18+5:302017-10-17T00:30:28+5:30

नेत्रदीपक आकाश कंदिल, आकर्षक पणत्या, फटा क्यांनी सजलेली दुकाने, पूजा साहित्याचे विशेष कीट, खतावणी  व रोजमेळच्या वह्या तसेच दीपावलीच्या पृष्ठभूमीवर नानाविध  साहित्याच्या खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची जाग ितक पर्यटन स्थळ लोणार सरोवर बाजारपेठांमध्ये झुंबड  उडाल्याचे पहावयास मिळत असून, ग्रामीण भागातही उत्साहाचे  वातावरण आहे. 

Market! | बाजारपेठेत झुंबड!

बाजारपेठेत झुंबड!

googlenewsNext
ठळक मुद्दे ग्रामीण भागातही उत्साह 

किशोर मापारी। 
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : नेत्रदीपक आकाश कंदिल, आकर्षक पणत्या, फटा क्यांनी सजलेली दुकाने, पूजा साहित्याचे विशेष कीट, खतावणी  व रोजमेळच्या वह्या तसेच दीपावलीच्या पृष्ठभूमीवर नानाविध  साहित्याच्या खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची जाग ितक पर्यटन स्थळ लोणार सरोवर बाजारपेठांमध्ये झुंबड  उडाल्याचे पहावयास मिळत असून, ग्रामीण भागातही उत्साहाचे  वातावरण आहे. 
यावेळी बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रे त्यांकडून विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. काहींनी  ग्राहकांची धावपळ होऊ नये, यासाठी एकाच छताखाली  फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्यांचे विशेष दी पावली कीट उपलब्ध करून दिले आहे. बाजारपेठेत फेरफटका  मारल्यास चिनी मालाची निर्माण होऊ पाहणारी मक्तेदारी भारतीय  साहित्याने मोडून काढल्याचे दिसत आहे. दिवाळीचे मुख्य  आकर्षण असणारे आकाश कंदिलाचे अनेक प्रकार बाजारात  दाखल झाले आहेत. यंदा चिनी मालाकडे ग्राहकांनी पाठ  फिरवली असून, पर्यावरणस्नेही विशेषत: हॅण्डमेड पेपर तसेच  कापडी आकाश कंदिलला विशेष मागणी आहे. कापडी आकाश  कंदिल साधारणत: ७0 पासून ५00 रुपयांपयर्ंत उपलब्ध आहेत.  त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा असे प्रकार आहेत. तर  प्लास्टिकद्वारे  तयार केलेला फायर बॉलही अनेकांचे लक्ष वेधून  घेत आहे. जुन्या चांदणी आकारातील आकाश कंदिल ५0 रु पयांपासून ४00 रुपयांपयर्ंत आहेत. याशिवाय सजावटीसाठी वा परण्यात येणारे लहान आकारातील आकाश दिव्यांच्या माळांची  ४0 रुपये डझन या दराने विक्री होत आहे. पणत्यांमध्ये नेहमीच्या  मातीच्या साध्या पणत्या १0 ते १५ रुपये डझन आहेत. कुंदन  वर्क, रंगीत  टिकली वर्क, सिरॅमिक वर्क असणार्‍या  पणत्या प्र ती नग २0 रुपयांपासून ५0 रुपयांपयर्ंत आहे. याशिवाय मेणाच्या  जेल, फ्लोटींग, सुगंधी असे विविध प्रकार ५५ रुपयांपासून  ४00 रुपयांपयर्ंत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत  आकाश कंदिल, पणत्यांच्या किमतीत २0 ते २५ टक्के वाढ  झाल्याची माहिती विक्रेते श्याम शिंगणे यांनी दिली, तसेच,  लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्या, बत्तासे हे साहित्य  २0 रुपयांपासून पुढे आहे. अभ्यंग स्नानासाठी आवश्यक उटणे,  सुगंधी तेलाची काही खास उत्पादने बाजारात आली आहेत.  आजच्या संगणकीय युगात पारंपरिक खतावणी व रोजमेळ,  रोजनिशी आपले महत्त्व अबाधित राखून आहेत. अगदी तळहा ताच्या आकारातील खतावण्यांपासून ए- ४ आकारातील  रोजमेळा, खतावण्या बाजारात ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.  सगळीकडे संगणकीकरण झाल्याने खतावणी, रोजमेळीला  ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद आहे; मात्र दिवाळीच्या तीन ते चार  दिवसात विशेष लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किमान पूजेसाठी व्या पार्‍यांकडून खतावणी वा रोजमेळी खरेदी केली जात असल्याचे  बुक डेपो संचालक  प्रमोद वर्‍हाडे यांनी सांगितले. दरम्यान,  नव्या वर्षांसाठी बाजारात विविध प्रकारच्या रोजनिशी या ३0 रु पयांपासून दीड हजारापयर्ंत उपलब्ध करून देण्यात आल्या  आहेत. दैनंदिन कामाच्या नियोजनासाठीचे प्लानर विविध  आकारात उपलब्ध आहे. 

कमी आवाजाच्या फटाक्यांना पसंती
शहर व परिसरात फटाक्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी सुरू  झाली आहे. नभांगण प्रकाशाने व्यापणार्‍या फटाक्यांना बच्चे कं पनीची विशेष पसंती मिळत आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी  ग्राहकांनी कमी आवाजाचे म्हणजेच म्युझिकल, केवळ  प्रकाशझोत फेकणार्‍या फटाक्यांना पसंती दिली आहे. त्यात  म्युझिकल बटरफ्लाय, रिमझिम असे प्रकार सर्वांचे लक्ष वेधत  असल्याचे यावेळी दिसून आले.

संगणकीकरणामुळे रोजनिशीला संमिश्र प्रतिसाद
आजच्या संगणकीय युगात पारंपरिक खतावणी व रोजमेळ,  रोजनिशी आपले महत्त्व अबाधित राखून आहेत. अगदी तळहा ताच्या आकारातील खतावण्यांपासून ए- ४ आकारातील  रोजमेळा, खतावण्या बाजारात ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे.  सगळीकडे संगणकीकरण झाल्याने खतावणी, रोजमेळीला  ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद आहे.

मालिकांमधील नायिकांच्या साड्यांची क्रेझ
कपडे खरेदीलाही उधाण आले आहे. विविध मालिकांमधील  नायिकांच्या साड्यांची क्रेझ महिला वर्गात दिसून येते. दुसरीकडे  महिलांसाठी सहा वार, तसेच नववार तयार साड्या ८00 ते  १५00 रुपयांपासून उपलब्ध असलेल्या दिसून येत आहे . बच्चे  कंपनी छोटा भीम, अँंग्री बर्ड, बॅनटेन, डोरोमनच्या पाहून आ पल्या कपड्यांची पसंती करत आहे.

Read in English

Web Title: Market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.