लंडनचा पाहुणा पोहचला गावात;  धामणगांवबढे व  सिंदखेड येथे ग्रामविकासाची केली पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:06 PM2018-02-16T15:06:45+5:302018-02-16T15:09:20+5:30

लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठचा विद्यार्थी ईवॉन फ्रेच ग्रामदुत असलेल्या सद्दाम खान या युवका सोबत मागील १५ दिवसांपासून औरंगाबादमधील जांभळी गावात वास्तव्यास होता.

London's guest arrives in village; Inspection of rural development at Dhamangav and Sindkhed | लंडनचा पाहुणा पोहचला गावात;  धामणगांवबढे व  सिंदखेड येथे ग्रामविकासाची केली पाहणी 

लंडनचा पाहुणा पोहचला गावात;  धामणगांवबढे व  सिंदखेड येथे ग्रामविकासाची केली पाहणी 

Next
ठळक मुद्देलंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठचा विद्यार्थी ईवॉन फ्रेच ग्रामदुत असलेल्या सद्दाम खान या युवका सोबत मागील १५ दिवसांपासून औरंगाबादमधील जांभळी गावात वास्तव्यास होता.त्यानंतर सद्दाम खानच्या बुलडाणा जिल्ह्यातील मुळ गाव धामणगांवबढे व सिंदखेड येथे नुकतीच भेट दिली. सिंदखेड ग्रामपंचायत मध्ये आयोजित कार्यक्रमात गावातील विकास कामांची माहिती ग्रामसेवक राजेंद्र वैराळकर यांनी दिली.

धामणगांवबढे : लोकमतच्या वृत्तामुळे अवघ्या महाराष्ट्राला माहिती झालेल्या सद्दाम खान व लंडनच्या पाहुणा ईपॉन फ्रेंच याने नुकतीच धामणगांवबढे व सिंदखेड येथे ग्रामविकासाची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या ग्रामपरिवर्तन अभियानाचा अभ्यास करण्यासाठी लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठचा विद्यार्थी ईवॉन फ्रेच ग्रामदुत असलेल्या सद्दाम खान या युवका सोबत मागील १५ दिवसांपासून औरंगाबादमधील जांभळी गावात वास्तव्यास होता. त्यानंतर सद्दाम खानच्या बुलडाणा जिल्ह्यातील मुळ गाव धामणगांवबढे व सिंदखेड येथे नुकतीच भेट दिली. सिंदखेड येथे या दोघांनी विकास कामाची माहिती घेतली. सरपंच विमल कदम यांनी दोघांचे स्वागत केले. सरपंच विमल कदम यांच्या नेतृत्त्वात सिंदखेड गावाने वेगाने प्रगती केली आहे. सिंदखेड ग्रामपंचायत मध्ये आयोजित कार्यक्रमात गावातील विकास कामांची माहिती ग्रामसेवक राजेंद्र वैराळकर यांनी दिली. तसेच यानिमित्त धामणगांवबढे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थआनी दिनकर बढे हे होते. यावेळी प्रामुख्याने माजी सरपंच रविशंकर मोदे, लक्ष्मण गवई, ग्रामपचायत सदस्य किशोर मोदे, गजानन घोंगडे, रियाज पटेल, शेख अफसर, आरिफ खान, अजित मोदे, गजानन गोरे, सचिन मोदे, शेख सादिक, इसाक पटले, अभिमन्यू सपकाळ उपस्थित होते. यावेळी ईवान फ्रेंच याने आपले अनुभव सांगितले तर सद्दाम खान यांनी ग्रामविकासाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नविन मोदे यांनी तर आभार कृणाल मोदे यांनी केले. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला ईवॉन व सद्दाम यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

 

सद्दाम खान ग्रामपरिवर्तन दुत सद्दाम ने मानले लोकमतचे आभार

धामणगांवबढे येथे झोपडपट्टीत राहणाºया सद्दाम खान याने ग्राम परिवर्तन अभियाना अंतर्गत औरंगाबाद जिल्हयातील जांभळी गावात केलेल्या कामाची आणि अभियानाच्या यशस्वीतेची माहिती लोकमतने २६ जानेवारी रोजी जगासमोर आणली. आणी सद्दाम ‘स्टार’ बनला. त्यादिवशी फोन सारखा खनखनत होता. मेल, व्हॉटसअप वरुन लोक सारखी विचारणा करित होते. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. अशी माहिती सद्दाम खान याने ग्रामपंचायत मध्ये आयोजित कार्यक्रमात दिली. झोपडपट्टीत राहणाºया सद्दामला ‘लोकमत’ने मोठे केले. आता माझी जबाबदारी अधिक वाढली असे सांगत सद्दामने लोकमत परिवाराचे आभार मानले.

Web Title: London's guest arrives in village; Inspection of rural development at Dhamangav and Sindkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.