पारा भडकल्याने खामगावकरांना धारा!

By admin | Published: May 28, 2017 04:18 AM2017-05-28T04:18:38+5:302017-05-28T04:18:38+5:30

सूर्याने रोहिणी नक्षत्रात २५ मे रोजी प्रवेश केल्यापासून नवतपा सुरू

Khamgaonkar karabarara striking the mercury! | पारा भडकल्याने खामगावकरांना धारा!

पारा भडकल्याने खामगावकरांना धारा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सूर्याने रोहिणी नक्षत्रात २५ मे रोजी प्रवेश केल्यापासून नवतपा सुरू झालेला असून, सूर्य आग ओकत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे आधीच ह्यहॉट सिटीह्ण असलेल्या खामगाव शहरातील रहिवाशांना नवतपा असह्य झाल्याचे दिसत आहे.
खामगाव शहराचे तापमान फक्त बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात उच्चांक गाठत असते. त्यामुळे खामगावला हॉट सिटी म्हणून ओळख लाभलेली आहे. त्यातच यंदाचा उन्हाळा चांगलाच तापताना दिसत असून, २५ मेपासून ह्यनवतपाह्णस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे तापमान ४६ अंशाच्या पुढे गेले असून, एसी व कुलरसुद्धा काम करीत नसल्याचे दिसून येते. नागरिकांच्या अंगातून घामाचे लोट वाहताना दिसतात.असह्य बनलेला हा नवतपा २ जूनपर्यंंत कायम राहणार असून, तोपर्यंत सूर्याचा ताप सहन करावा लागणार असल्याचे दिसून येते, तर दुपारच्यावेळी उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. सायंकाळी मात्र एकाचवेळी नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत असल्याने बाजारात मोठी रेलचेल असते.
चांगल्या पावसाचे संकेत
ज्योतिष शास्त्राच्या सिद्धांतानुसार नवतपामध्ये जास्त गर्मी होणे हे चांगल्या पावसाचे संकेत आहेत. याउलट नवतपात गर्मी नसेल, तर पाऊस चांगला होणार नाही, असे मानले जाते. यावर्षी नवतपामध्ये सूर्याचा ताप जास्त जाणवत असल्याने ज्योतिष शास्त्रानुसार हे चांगल्या पावसाचे लक्षण आहे.
काय असतो नवतपा ?
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य व पृथ्वीमधील अंतर कमी होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढते. यावेळी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. हे नक्षत्र १५ दिवस राहते. पण, सुरुवातीचे नऊ दिवस उन्हाची प्रखरता अधिक जाणवते. यावेळेस २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून, तो ३ जूनपर्यंंत या नक्षत्रात राहणार आहे.

Web Title: Khamgaonkar karabarara striking the mercury!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.