खामगाव पालिकेची दीडपट उद्दिष्टपूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:01 AM2017-08-18T00:01:25+5:302017-08-18T00:14:09+5:30

खामगाव : स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत नियोजित उद्दिष्टापेक्षा ५0 टक्के अधिक कामगिरी केली आहे. त्यामुळे शौचालय बांधकामात खामगाव पालिकेने जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिकांना मागे टाकल्याचे दिसून येते. 

Khamgaon municipality fulfills the goal! | खामगाव पालिकेची दीडपट उद्दिष्टपूर्ती!

खामगाव पालिकेची दीडपट उद्दिष्टपूर्ती!

Next
ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानजिल्ह्यातील पालिकांना टाकले मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :      स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत नियोजित उद्दिष्टापेक्षा ५0 टक्के अधिक कामगिरी केली आहे. त्यामुळे शौचालय बांधकामात खामगाव पालिकेने जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिकांना मागे टाकल्याचे दिसून येते. 
 शहरातील २९ हजार ९६५ मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करून नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी ३२५0 शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्‍चित केले. दरम्यान, शहरातील उघड्यावरील हगणदरी करणार्‍यांची संख्या लक्षात घेता, पालिका प्रशासनाकडून फेरसर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात शौचालय नसणार्‍या १४२९ लाभार्थींची वाढीव यादी तयार करण्यात आली. यापैकी १४00 जणांचे शौचालयांसाठी अर्ज भरून घेण्यात आले. दरम्यान, पालिकेच्या या भूमिकेमुळे खामगाव शहरात उद्दिष्टापेक्षा दीडपट अधिक शौचालयांची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान, उद्दिष्टापेक्षा अधिक ५0 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारी खामगाव नगरपालिका जिल्ह्यात एकमेव पालिका असल्याचे उपलब्ध आकडेवरून दिसून येते. दरम्यान, जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत हगणदरीमुक्त अभियान सुरू असून, गुड मॉर्निंग पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

हगणदरीमुक्तीसाठी पालिकेचे प्रयत्न!
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा एक भाग म्हणून खामगाव नगरपालिकेने स्वच्छ शहराच्या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर शहरातील उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. उघड्यावर हगणदरी करणार्‍या ३२ नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

असे आहे शौचालय बांधकामाचे अनुदान!
स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यामध्ये सहा हजारांचा पहिला हप्ता दिल्या जातो. दुसरा हप्ताही सहा हजारांचा असून, उर्वरित पाच हजारांचा शेवटचा हप्ता पालिका प्रशासनाकडून प्रदान करण्यात येतो. लाभार्थींच्या बँक खात्यात संपूर्ण अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. 

खामगाव शहराच्या फेरसर्वेक्षणानंतर शौचालय बांधकामासाठी अतिरिक्त लाभार्थी मिळाले. त्यानुषंगाने उद्दिष्टापेक्षा अधिक नागरिकांना शौचालय योजनेचा लाभ दिल्या जात आहे. संपूर्ण हगणदरीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
- धनंजय बोरीकर,मुख्याधिकारी, खामगाव.

Web Title: Khamgaon municipality fulfills the goal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.