खामगावची गायत्री करणार मराठा मोर्चाचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:12 AM2017-08-09T01:12:53+5:302017-08-09T01:13:41+5:30

खामगाव: येथील गायत्री भोसले हिला मुंबईतील मराठय़ांच्या विराट मोर्चाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मराठा समाजाच्यावतीने आयोजित भव्य क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात मराठा बांधवांचे मुंबईकडे येणे सुरु झाले आहे. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे.

Khamgaon Gayatri will lead the Maratha Morcha | खामगावची गायत्री करणार मराठा मोर्चाचे नेतृत्व

खामगावची गायत्री करणार मराठा मोर्चाचे नेतृत्व

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्याला मिळाला मोर्चामध्ये अग्रस्थानी राहण्याचा मान मुंबई येथे आयोजित मराठा मोर्चाचे करणार नेतृत्व मोर्चाच्या अग्रस्थानी वंदनाताई राहणार जिजाऊंच्या वेशभूषेत 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील गायत्री भोसले हिला मुंबईतील मराठय़ांच्या विराट मोर्चाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
 मराठा समाजाच्यावतीने आयोजित भव्य क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात मराठा बांधवांचे मुंबईकडे येणे सुरु झाले आहे. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील गायत्री भोसले या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. वंदनाताई  जिजाऊंच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी होऊन मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत. ९ ऑगस्टला काढण्यात येणार्‍या मराठा मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे.  राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आता मराठा समाजातर्फे राज्याच्या राजधानीत शक्ती प्रदर्शन होणार आहे; तसेच बुलडाण्यातील वंदना निकम मुंबई येथे जिजाऊंची वेशभुषा परिधान करणार आहेत. मातृतीर्थ जिजामातेच्या जिल्ह्यातील असल्याने निकम यांना जिजाऊंची वेशभुषा धारण करून मोर्चाच्या अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. 

Web Title: Khamgaon Gayatri will lead the Maratha Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.