राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार; शेती होणार सुजलाम-सुफलाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 07:52 PM2018-02-14T19:52:23+5:302018-02-14T20:07:15+5:30

खामगाव:  शेतक-यांच्या शेतीसह राज्यातील प्रत्येक जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचा शुभ संकल्प भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या संकल्पाचाच एक भाग म्हणून राज्यातील १७५ तालुक्यातील गाळाचा उपसा करण्याच्या मोहिमेला सुरूवात होणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांना प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, फेब्रुवारी महिना अखेरीस राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेस सुरूवात होईल.

Initiatives of Jain unions for the emancipation of the State; Sujlam-Suphlam will be farming! | राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार; शेती होणार सुजलाम-सुफलाम!

राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार; शेती होणार सुजलाम-सुफलाम!

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील गाळ उपसा प्राधान्याने करणारराज्यातील १७५ तालुक्यांमध्ये केल्या जाणार गाळाचा उपसाजैन संघटनेच्या दातृत्वात शासनाचाही मदतीचा हात

अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  शेतक-यांच्या शेतीसह राज्यातील प्रत्येक जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचा शुभ संकल्प भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या संकल्पाचाच एक भाग म्हणून राज्यातील १७५ तालुक्यातील गाळाचा उपसा करण्याच्या मोहिमेला सुरूवात होणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांना प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, फेब्रुवारी महिना अखेरीस राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेस सुरूवात होईल. 
पूर, महापूर आणि भूकंप-त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीसोबतच आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी भारतीय जैन संघटनेचा सदैव पुढाकार राहीला आहे. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वात समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून जाणाºया भारतीय जैन संघटनेने आता राज्य दृष्काळमुक्त करण्यासाठी सिंचनावर भर देण्याचा निर्णय घेतला असून, या मोहिमेतंर्गत राज्यातील १७५ तालुक्यातील नदी, नाल्यांसोबतच शेत रस्त्याच्या कडेला असलेल्या गाळाचा उपसा करणाºयात येईल. या मोहिमेत जिल्ह्यातील जैन समाजाबांधवासोबतच इतरही मान्यवरांची मदत लाभणार असल्याची माहिती आहे. अतिशय शास्त्रशुध्द आणि तांत्रिक पध्दतीने ही मोहिम राबविण्यासाठी सबंधीत क्षेत्रातील तांत्रिक सल्लागारांची मदत घेण्यात येणार असून, काही वरिष्ठ अभियंत्यांसह, अभियंता आणि संबधीत क्षेत्रातील तज्ज्ञांचीही निवड करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी मुख्य जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांच्यासोबतच उपजिल्हा समन्वयक जीतेंद्र जैन, प्रेम झाबंड, अतिरिक्त प्रभारी विनोद निरखे, शीतल गादीया, प्रदीप बेगाणी, जयेश बांठीया, संदीप नहार सदस्य असलेल्या समितीची निवड करण्यात आली आहे.

अडीच हजारापेक्षा जास्त जेसीबी-पोकलेनचा होणार वापर!
राज्यातील तब्बल १७५ तालुक्यातील गाळाचा उपसा करण्यासाठी संघटेनेच्यावतीने अडीच हजारापेक्षा जास्त जेसीबीचा वापर करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे १०० जेसीबी बुलडाणा जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत. जैन संघटनेच्यावतीने उपलब्ध करून दिल्या जाणाºया मशीनरीज्च्या इंधनाचा खर्च शासनाकडून केल्या जाणार आहे. जैन संघटनेच्या दातृत्वात शासनाचाही मदतीचा हात लागणार असल्याने, राज्यातील कोट्यवधी शेतकºयांना या उपक्रमाचा लाभ पोहोचणार आहे.

  • बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागासोबतच सर्वच १३ तालुक्यांमध्ये एकाच वेळी गाळाचा उपसा केल्या जाईल. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या मोहिमेला सुरूवात होईल. या मोहिमेला शास्त्रशुध्द आणि तांत्रिक पध्दतीने राबविण्याचे प्रयत्न आहेत. - श्रीकृष्ण लांडे, वरिष्ठ  अभियंता, गाळ उपसा मोहिम, बुलडाणा.
  • भारतीय जैन संघटनेचा समाजाच्या उत्थानासाठी सदैव पुढाकार राहीला आहे. आता दृष्काळ मुक्तीसाठी गाळ काढण्याची मोहिम बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिल्या जाणार आहे. - राजेश देशलहरा, मुख्य जिल्हा समन्वयक भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र

Web Title: Initiatives of Jain unions for the emancipation of the State; Sujlam-Suphlam will be farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.