मुल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत 42 प्रेरकांचा सन्मान : नंदुरबारात शांतीलाल मुथा फाऊंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:48 PM2018-02-08T12:48:34+5:302018-02-08T12:48:38+5:30

42 honors under the scheme of value addition: Shantilal Mutha Foundation's initiative in Nandurbar | मुल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत 42 प्रेरकांचा सन्मान : नंदुरबारात शांतीलाल मुथा फाऊंडेशनचा उपक्रम

मुल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत 42 प्रेरकांचा सन्मान : नंदुरबारात शांतीलाल मुथा फाऊंडेशनचा उपक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद शाळांमध्ये मुल्यवर्धन या उपक्रमाअंतर्गत महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांचा सन्मान शांतिलाल मुथा फाऊंडेशनतर्फे बुधवारी करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्याथ्र्यामध्ये भारतीय राज्य घटनेची मूल्य रुजविण्यासाठी मुल्यवर्धन उपक्रम कार्यान्वीत करण्यात आला आहे. यात महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डॉ.कांतिलाल टाटीया होते. गट शिक्षणाधिकारी अरुण पाटील, नरेश कांकरिया, हनुमंत खोत, एस.एन.आवटे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना टाटिया यांनी सांगितले, शांतिलाल मुथा फाऊंडेशनने या कार्यक्रमाची आखणी 2009 सालापासून केलेली आहे. संशोधनावर आधारीत आठ वर्षापासून प्रयोग करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तो यशस्वी झाला आहे. राज्यातील 107 तालुक्यातील दहा लाख विद्याथ्र्यार्पयत हा कार्यक्रम पोहचला आहे. नंदुरबार तालुक्यातील 42 शिक्षक व केंद्रप्रमुखांनी मास्टर ट्रेनिंग पुर्ण केले आहे. दोन महिने त्यांनी विद्याथ्र्यावर मुल्यवर्धन प्रशिक्षणाअंतर्गत असलेल्या कृती केलेल्या आहेत. अशा प्रेरक व केंद्रप्रमुखांचा हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.    
 

Web Title: 42 honors under the scheme of value addition: Shantilal Mutha Foundation's initiative in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.