विदर्भातील केवळ चार जिल्ह्यात फलोत्पादन कार्यक्रम!

By admin | Published: December 25, 2016 02:22 AM2016-12-25T02:22:36+5:302016-12-25T02:22:49+5:30

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये

Horticulture program in only four districts of Vidarbha! | विदर्भातील केवळ चार जिल्ह्यात फलोत्पादन कार्यक्रम!

विदर्भातील केवळ चार जिल्ह्यात फलोत्पादन कार्यक्रम!

Next

ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. २४- रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात राबविण्यात येणारा फलोत्पादन कार्यक्रम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या चार जिल्ह्यात पोहचला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये निधी फळलागवडसाठी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विदर्भातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
पारंपारिक पिकांना फाटा देवून शेतीत आधुनिकीरण आणण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्याची गरज असते. फळलागवडसारख्या पिकांमुळे शेतकर्‍यांचा विकास साधला जावू शकतो. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फळलागड कार्यक्रम राबविण्यात येतो. फलोत्पादनासाठी रोहयोकडून शेतकर्‍यांना निधीही देण्यात येतो; यामध्ये राज्यातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये फळलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांचा रोहयोच्या फलोत्पादन कार्यक्रमात समावेश असून इतर जिल्हे या फलोत्पादनापासून दूर आहेत. राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, परभणी, अकोला, पालघर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २0१५-१६ व २0१६-१७ या दोन वर्षासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांकरिता एकूण ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी २७ लाख ७६ हजार रुपये, रत्नागिरी ३१ लाख ३५ हजार, नाशिक १ कोटी ६४ लाख १३ हजार, धुळे २९ लाख ९0 हजार, परभणी ३८ लाख ९३ हजार, अकोला जिल्ह्याकरिता ६६ लाख ७0 हजार, पालघर, ५१ लाख ४६ हजार, सोलापूर १ कोटी ५ लाख ७५ हजार, कोल्हापूर १३ लाख ५१ हजार, जळगाव २३ लाख ७८ हजार, अहमदनगर १ कोटी ६१ लाख २ हजार, बीड ६४ लाख ५२ हजार, नांदेड ३७ लाख ६ हजार, लातूर २५ लाख, यवतमाळ ५५ लाख १४ हजार, बुलडाणा २0 लाख २७ हजार व अमरावती जिल्ह्याकरिता ६८ लाख ५४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


रोहयोमुळे फळलागवडीला संजीवनी
फळलागडीसाठी लागणारा खर्च शेतकरी भरू शकत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सिंचनाची व्यवस्था असतांनाही फळगावडीकडे पाठ फिरवली होती; मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फलोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने फळलागवडीला संजिवनी मिळाली आहे. फळलागवडीसाठी रोहयोकडून निधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी या योजनेतून फळलगावडीकडे वळले आहेत.

Web Title: Horticulture program in only four districts of Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.