बुलडाण्यात नालीतून वाहला चार हजार लिटर हातभट्टी दारूचा सडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:27 PM2018-12-22T17:27:57+5:302018-12-22T17:36:04+5:30

या कारवाईदरम्यान, जप्त करण्यात आलेला तीन हजार ८१९ लिटर दारूचा सडवा नालीत ओतून देण्यात आल्याने पाण्या ऐवजी नालीतून चक्क गावठी हातभट्टीची दारू वाहत असल्याचे चित्र २२ डिसेंबर रोजी दिसून आले.

The four thousand liters liquor sieze in Buldhada | बुलडाण्यात नालीतून वाहला चार हजार लिटर हातभट्टी दारूचा सडवा

बुलडाण्यात नालीतून वाहला चार हजार लिटर हातभट्टी दारूचा सडवा

Next

बुलडाणा: गावठी हातभट्ट्यांचा सुकाळ झालेल्या बुलडाणा शहरातील भीलवाडा आणि कैकाडी पुरा परीसरात पोलिस दलासह राज्य उत्पदान शुल्क विभागाने दहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून समारे चार हजार लिटर गावठी हातभट्टीसाठी लागणारा सडवा जप्त केला.

या कारवाईत दहा जणाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान, जप्त करण्यात आलेला तीन हजार ८१९ लिटर दारूचा सडवा नालीत ओतून देण्यात आल्याने पाण्या ऐवजी नालीतून चक्क गावठी हातभट्टीची दारू वाहत असल्याचे चित्र २२ डिसेंबर रोजी दिसून आले. नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वच उत्सूक असले तरे असामाजिक तत्व त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता पाहता आणि अवैधरित्या हातभट्टीची दारू व्यापक प्रमाणावर विक्री होण्याची शक्यता तपासता बुलडाणा पोलिस दल, राज्य उत्पादन शुल्क आणि बुलडाणा शहर पोलिसांनी २२ डिसेंबरला शहरातील भीलवाडा आमि कैकाडीपुरा भागात जवळपास दहा ठिकाणी छापे टाकले. बुलडाणा येथील ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस. डी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा शहर पोलिस स्टेशेनचे पोलिस निरीक्षक यु. के. जाधव व सहकार्यांनी केली. या कारवाईत एक लाख सात हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. एक महिला मात्र फरार होण्यात यशस्वी झाली. या प्रकरणात दहा जणावर गुन्हे नोंदविण्यात आले असून सुमन देवसिंग ठाकरे, चंदाबाई बबन माळे, प्रभा संतोष बरडे, सुशीलाबाई बाबुलाल गायकवाड (सर्व रा. भीलवाडा) यांना अटक करण्यात आली असून ताईबाई अंबादास बरडे ही महिला फरार झाली आहे.

या कारवाईत २०५ लिटर हातभट्टीची दारू, तीन हजार ८१९ लिटर गावठी दारूचा सडवा, १३ प्लास्टीकचे ड्रम, टिनाचे पिपे यासह अन्यसाहित्य असा एकूण एक लाख सात हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी संबंधितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलमातंर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागातील जिल्हा भरारी पथकाचे डी. आर. शेवाळे, बुलडाण्याचे दुय्यम निरीक्षक व्ही. आर. बरडे, एस. डी. चव्हाण, ऐ. आर. अडाळकर, बुलडाणा पोलिस विभागातील अधिकारी संतोष जंजाळ, महिलापोलिस पथक प्रमुख चंदा साठे व अन्य तीन महिला कर्मचारी, आरसीपी पथकाचे रामेश्वर राठोड, विलास पवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पहाडे, देशमुख, तिवाने, निकाळजे, चव्हाण, कुसरळकर, सौभागे, मोरे, पाटील, सोनाली उबरहंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

मद्यपींवर करडी नजर

३१ डिसेंबरच्या पृष्ठभूमीवर पोलिस प्रशासनानेही मद्यपींवर करडी नजर ठेवण्यास प्रारंभ केला असून गावठी हातभट्टीची दारू बनविणारे ठिकाणे शोधून त्याचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कृती करण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा पोलिस दलाची त्यानुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातच संयुक्त कारवाई केली जाणार आहे.

Web Title: The four thousand liters liquor sieze in Buldhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.