बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणी पुरवठा योजनांची माजी राज्यमंत्र्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 04:40 PM2018-01-10T16:40:24+5:302018-01-10T16:44:02+5:30

डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला .

Former Minister of State take revieve Water Supply Schemes of Buldhana District | बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणी पुरवठा योजनांची माजी राज्यमंत्र्यांनी केली पाहणी

बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणी पुरवठा योजनांची माजी राज्यमंत्र्यांनी केली पाहणी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ५८ गावातील पाणीपुरवठा योजनेचे विदारक चित्र. ६ दिवसात ५८ गावांना भेटी देवून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला.

डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला असून १ ते ६ जानेवारी दरम्यान ६ दिवसात ५८ गावांना भेटी देवून तेथील गावकºयांशी संवाद साधीत शासकीय नळपाणी पुरवठा योजनेचे विदारक चित्र जाणून घेतले.
जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ६ दिवसात ५८ गावापैकी जवळपास ५१ गावांमध्ये गावकºयांना नळयोजनेव्दारे पाणीच मिळत नसल्याचे दिसून आले. तर ६ जानेवारीला सुबोध सावजी यांनी डोणगाव येथील साडेचार कोटीच्या नळयोजनेची पाहणी केली. यावेळी योजनेचा केवळ सांगाडा उभा होता तर नळयोजनेतून पाणी येत नव्हते. ३५ वर्षापुर्वीच्या जुन्या नळयोजनेतून महिन्यात चारवेळा डोणगावला पाणी मिळत असून साडेचार कोटी रूपये खर्चुनही अधिकाºयांच्या भ्रष्टाचारामुळे डोणगावला पाणी नाही व वरून वाढीव योजनेची मागणी या सर्व गोष्टीचा आढावा घेवून सायंकाळी ५ वाजता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आठवडी बाजरात सभा घेऊन जनतेला अधिकाºयांनी प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देवून जनतेचे हाल पाण्याअभावी कसे होत आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर जळगाव जामोद, संग्रामपूर या भागातील दौरा करणार असल्याचे सांगून समाजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते शैलेश सावजी, नामदेव काळे, अबरार खान मिल्ली, जितेंद्र अंबेकर, रहीम खान, उस्मान शाह, शाम इंगळेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शैलेश सावजी यांनी डोणगाव येथील राष्टÑीय पेयजल योजनेची माहिती देऊन या गावात वार्ड क्रमांक २ मध्ये नळयोजनेला पाणी नसताना ही पाईपलाईन खोदण्यात आली येवढा मोठा भ्रष्टाचार असताना या योजनेसाठी वाढीव पैसा मागण्यात आला हा कशासाठी ३० वर्षापुर्वीच्या योजनेतून महिन्यात एकदा पाणी मिळते अशी माहिती दिली. (वार्ताहर)

 

 

 

Web Title: Former Minister of State take revieve Water Supply Schemes of Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.