अवैध वृक्ष तोडीवर कारवाईसाठी वनविभागाला सापडला मुहुर्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 04:56 PM2019-05-05T16:56:36+5:302019-05-05T16:56:42+5:30

सिंदखेड राजा: वृक्ष  लागवड व संवर्धनावर शासन करोडो रुपय खर्च करत असताना दुसरीकडे राजरोसपणे वृक्षाची कत्तल सुरू आहे. दरम्यान, आता तालुक्यात अवैध वृक्षतोडीवर कारवाईसाठी वनविभागाला मुहुर्त सापडला आहे.

Forest department take action against illegal tree cutting | अवैध वृक्ष तोडीवर कारवाईसाठी वनविभागाला सापडला मुहुर्त  

अवैध वृक्ष तोडीवर कारवाईसाठी वनविभागाला सापडला मुहुर्त  

Next


सिंदखेड राजा: वृक्ष  लागवड व संवर्धनावर शासन करोडो रुपय खर्च करत असताना दुसरीकडे राजरोसपणे वृक्षाची कत्तल सुरू आहे. दरम्यान, आता तालुक्यात अवैध वृक्षतोडीवर कारवाईसाठी वनविभागाला मुहुर्त सापडला आहे. वनरक्षक  आर. एस. जोगदंड यांनी वन विभागाच्या इतर अधीकाºयांना बोलाऊन अवैधरीत्या तोडून टाकलेल्या १९ निंबाच्या झाडाची मोठ-मोठी लाकडे जप्त केली आहेत. ही कारवाई जिजाऊ सृष्टी परिसरात शनिवारी घडली आहे.  
आधुनीक तंत्रज्ञानामुळे देशाची झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली. मात्र त्याचे दुष्परिणाम सुध्दा पहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी घणदाट जंगल असायचे, त्यामुळे पाऊस सुध्दा चांगला पडायचा. जंगलात पशु -पक्षी, वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे, माकड, हरण, रोही, बीबट, मोर हे गुण्या गोविंदाने जंगलात वास्तव्य करीत होते. परंतु मानवाच्या गरजा भागविण्यासाठी जंगलात अतिक्रमण झाले. जंगलात वृक्षतोड वाढल्यामुळे जंगल ऊजाड झाले. त्यामुळे जंगलातील प्राणी बीबटे वस्त्यामध्ये घुसायला लागले आहेत. तर काही प्राणी रोही, हरण, आस्वल, रानडुक्कर शेतातील पिकांची नासाडी करायला लागले दिसतात. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामस्वरूप दुष्काळाच्या संकटाची दाहकता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी शासन हजारो कोटी रुपयांचा खर्च करताना दिसत आहे. तर दुसरीकडे ज्या वन विभागाच्या भरवशावर वृक्ष लागवडीचे व संगोपणाचे शासनाने उदीष्ट ठेवले त्याच वनविभागाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षाने हजारो वृक्षांची कत्तल तालुक्यात सुरू आहे. वृक्षतोडीला परवानगी देण्याचे सर्व अधिकार  वनविभाकडे असल्यामुळे वृक्षतोड माफीया व अधिकाºयांचे संगनमताने पाच झाडाचे परवाने दिल्यास त्या परवान्यावर ५० झाडाची कत्तल केली जात आहे. दरम्यान, जिजाऊ सृष्टी जवळ तोडून टाकलेल्या निंबाच्या लाकडावर सिंदखेड राजा येथील वनरक्षक कु. आर. एस. जोगदंड यांनी ३ मे रोजी धाड टाकली. सहाय्यक वनसंरक्षक बुलडाणा, वन परिक्षेत्र अधीकारी देऊळगाव राजा यांना पाचारण करुन कारभारी यादवराव घोंगे, गोपीनाथ कडूबा जाधव या पंचासमक्ष १९ निंबाचे झाडे तोडलेल्या लाकडाचे पंचनामे करुन लाकूड जप्त करण्यात  आले. हे साठवुन ठेवलेली निंबाची लाकडे भास्कर बळवंतराव खंडारे यांच्या मालकीची असून त्यांचे कडे फक्त  सहा निंबाची झाडे तोडण्याचा परवाना असल्याची माहिती पंचनाम्यात देण्यात आली आहे. लाकडांचे मोजमाप करुन जत्प केल्यावर काळापाणी नर्सरीत साठवण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

वृक्षतोड माफियांमध्ये खळबळ 
सिंदखेड राजा येथे १९ निंबाच्या झाडाची मोठ-मोठी लाकडे जप्त करून केलेल्या कारवाईमुळे वृक्षतोड माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई एकाच व्यक्तीवर झाली असून ईतर वृक्षतोड माफीयांना वनविभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Forest department take action against illegal tree cutting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.