बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर- बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:36 AM2017-12-30T00:36:00+5:302017-12-30T00:36:24+5:30

बुलडाणा :  कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना म्हणजे स्वातंत्र भारताची निर्मितीची बिजे रोवली गेली होती, असे भावपूर्ण उदगार काढून जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचा संकल्प जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार  राहून बोंद्रे यांनी केले.

Focusing on strengthening the organization of Congress in the district - Bondre | बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर- बोंद्रे

बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर- बोंद्रे

Next
ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित स्थापना दिनी संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना म्हणजे स्वातंत्र भारताची निर्मितीची बिजे रोवली गेली होती, असे भावपूर्ण उदगार काढून जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचा संकल्प जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार  राहून बोंद्रे यांनी केले.
स्थानिक जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात २८ डिसेंबर रोजी कॉंग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला,  त्याप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी आ. राहुल बोंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ  यांची प्रमुख उपस्थिती होती.  आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ. बोंद्रे पुढे म्हणाले की, इंग्रज अंमल असलेल्या देशात गुलामगिरी होती, कोणतेच स्वातंत्र नव्हते, विकास कोसो दूर होता, देशाला इंग्रज गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय विकास शक्य नव्हता, तेंव्हा काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली.  पुढे काँग्रेस पक्षाने राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, लाला लजपत राय यांच्या पुढाकारातून इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह, लढे, आंदोलने अशा माध्यमातून जनजागृती करीत देषभक्तांच्या हौताम्यातून या देशाला स्वातंत्र मिळवून दिले, हे केवळ काँग्रेस पक्षामुळेच घडून आले हा इतिहास व वारसा आहे.
 यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन आ.बोंद्रे यांन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मुख्त्यारसिंग राजपूत, अँड. जयश्री शेळके, बाळाभाऊ भोंडे, दिपक रिंढे, समाधान हेलोडे, बाबासाहेब भोंडे, राजीव काटीकर, संजय पांढरे, सुनिल तायडे, अँड.शरद राखोंडे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, सुनिल सपकाळ, विनोद बेंडवाल, अशोक जैस्वाल, जाकीर कुरेषी, संदीप बिल्लारी, उत्तम बाजड, सुनिल पणपालीया, सुरेश सरकटे, अँड. राज शेख, गणेश राजपूत, बंळू काळवाघे, पि.डी. महाले, शैलेष खेडकर, धनराज पाटील, विजय निकाळजे, निलेश हरकळ, प्रमिलाताई गवई, नंदिनी टारपे, ज्योत्सना जाधव, संध्या इंगळे, बानोबी चैाधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-
 

Web Title: Focusing on strengthening the organization of Congress in the district - Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.