लाच मागणार्‍या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:24 AM2017-11-14T01:24:19+5:302017-11-14T01:24:58+5:30

विहीर बांधकामाचा धनादेश काढून देण्यासाठी २0 हजार रुपयाची लाच मागणार्‍या खामगाव तालुक्यातील कंचनपूरच्या ग्रामसेवकाविरुद्ध लाचलुचपत विभागाने सोमवारी गुन्हा दाखल केला. 

Filed a complaint against a Gram Sevak seeking a bribe | लाच मागणार्‍या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

लाच मागणार्‍या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देविहीर बांधकामाचा धनादेश काढून देण्यासाठी मागितली २0 हजार रुपयाची लाचकंचनपूरच्या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विहीर बांधकामाचा धनादेश काढून देण्यासाठी २0 हजार रुपयाची लाच मागणार्‍या खामगाव तालुक्यातील कंचनपूरच्या ग्रामसेवकाविरुद्ध लाचलुचपत विभागाने सोमवारी गुन्हा दाखल केला. 
कंचनपूर येथील ग्रामसेवक परमेश्‍वर किसन पिसे याच्याकडे आवार ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे. तेथील विहीर बांधकाम व पाइपलाइनसाठी लागणार्‍या साहित्य खरेदीचा ७६ हजार रुपयाचा धनादेश काढून देण्यासाठी २0 हजार रुपयाची लाच त्यांनी मागितली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरुन एसीबीने पडताळणी केली. त्यात ग्रामसेवकाने २0 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पिसे विरोधात गुन्हा दाखल केला. 

Web Title: Filed a complaint against a Gram Sevak seeking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा