दुष्काळ मुक्तीसाठी झटण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच - चिन्मय फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 07:24 PM2019-04-27T19:24:36+5:302019-04-27T19:25:16+5:30

- अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना ...

To fight for get rid of drought is everyone responsibility | दुष्काळ मुक्तीसाठी झटण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच - चिन्मय फुटाणे

दुष्काळ मुक्तीसाठी झटण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच - चिन्मय फुटाणे

Next

- अनिल गवई।

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना अभावी विदर्भातील अनेक खेड्यात जलसंकट निर्माण झाले. जलसंकटावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येकानेच दुष्काळाशी दोन हात करण्यात मदत करणे गरजेचे आहे. पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे यांच्याशी साधलेला संवाद...

पाणी फाउंडेशनच्या कार्याला कधीपासून सुरूवात झाली? राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिीती बघता सिने अभिनेते अमिरखान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी पाच वर्षांपूर्वी ‘पाणी फाउंडेशन’ची स्थापना केली. आता श्रमदानातून हळूहळू ही चळवळ विदर्भातील कानाकोपºयात बळकट होतेय. अगदी बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातही ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन केल्या जातेय.

वाटर कप स्पर्धेत सहभागी गावांच्या निवडीचे निकष काय?

जलसंवर्धन व पाणलोट व्यवस्थानाची उत्तम कामगिरी करणाºयासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये स्पर्धा लावली जाते. या गावांची विदर्भ, जिल्हा स्तरावर पाहणी केली जाते. पाहणीत श्रमदान आणि इतर दुष्टीकोनातून झालेल्या कामगिरीच्या आधारावर उत्कृष्ट गावांना पुरस्कृत करण्यात येते.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा तालुक्यातील विविध गावांचे निरिक्षण गत आठवड्यात करण्यात आले. विविध गावांमध्ये समाधानकारक कामगिरी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विदर्भाच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? श्रमदानातून दृष्काळमुक्तीच्या दिशेने पाणी फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे. विदर्भातील विविध गावांचा यामध्ये सुरूवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. विदर्भातील १४७१ गावांनी ‘वाटर’कप स्पर्धेत सहभाग नोंदविलाय. वारेमाप वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. जलस्तर सतत खालावत जात आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे सावट टाळण्यासाठी प्रत्येकाने श्रमदानात सहभागी होण्याची गरज आहे. श्रमदानातूनच ही चळवळ गतीमान होईल.

पाणी फाउंडेशनतंर्गत विदर्भात आतापर्यंत किती जणांना प्रशिक्षण देण्यात आले. ?

भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी तसेच अधिकाअधिक सहभागासाठी विविध गावांचा समावेश ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत ‘वाटर कप’ स्पर्धेत करण्यात येत आहे. विदर्भातील ८ हजार २३६ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षणार्थी आपल्या गावाकडील युवक आणि युवती आणि महिलांचा सहभाग वाढवित आहेत. या सकारात्मक प्रतिसादाचा मनस्वी आनंद आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी विदर्भातील गावांचा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत वाढता सहभाग असून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावेही सहभागी झाली आहेत.

Web Title: To fight for get rid of drought is everyone responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.