विदर्भातील शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत  रेशीम शेतीचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:38 PM2018-12-21T17:38:33+5:302018-12-21T17:38:43+5:30

बुलडाणा: तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकºयांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत.

Farmers of Vidarbha are being given the lessons of silk farming! | विदर्भातील शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत  रेशीम शेतीचे धडे!

विदर्भातील शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत  रेशीम शेतीचे धडे!

Next

बुलडाणा: तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकºयांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. यातून रेशीम उद्योगाला चालना मिळत असून बुलडाणा जिल्ह्यातही रेशीम रथ यात्रेच्या माध्यमातून गावोगावी रेशीम प्रकाल्पाचे धडे दिले जात आहेत. 
नवीन तुती लावगड करण्याकरिता उत्सुक असलेल्या शेतकºयांची नोंदणी करण्यासाठी महा-रेशीम अभियान २०१९  हाती घेण्यात आले आहे. हे अभियान १५ ते २९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महा रेशीम रेशीम अभियानाचे उध्दघाटन १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमात नागपूर शहरात रेशीम रथ यात्रा काढण्यात आली. या प्रसंगी रेशीम पुस्तिका, रेशीम ग्राम संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. हे महारेशीम अभियान आता   बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. निवडक गावात रेशीम रथ रेशीम शेतीची माहिती देउन शेतकºयांची रेशीम शेतीसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांनी नवीन तुती लागवडीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

महारेशीम अभियानाचा प्रचार रथ सज्ज
जिल्ह्यात २९ डिसेंबर पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानादरम्यान नवीन तुती लागवड करून रेशीम उद्योग करण्यास उत्सुक असलेल्या शेतकºयांची नोंदणी करण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारासाठी रेशीम रथ तयार करण्यात आला असून या रथाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे  यांचेहस्ते हिरवी झेंडी दाखवून नुकतेच करण्यात आले.

 
रेशीम रथ जिल्ह्यातील निवडक गावागावात जावून रेशीम प्रकल्पाची माहिती देणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमतंर्गत रेशीम प्रकल्पास तीन वर्ष अकुशल व कुशल मजूरी मिळून २ लक्ष ९२ हजार रूपयांचा निधी देण्यात येतो. यामध्ये रेशीम किटक संगोपन गृह बांधण्यासाठीची मदतसुद्धा भूधारक (पाच एकर पेक्षा कमी) आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Web Title: Farmers of Vidarbha are being given the lessons of silk farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.