बोरखेड येथील शेतकर्‍यांनी उभ्या पिकात चारली मेंढरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:15 AM2017-11-25T01:15:10+5:302017-11-25T01:21:54+5:30

बोरखेड : यावर्षी खरिपाचे उडीद, मूग सोयाबीनच्या पाठोपाठ कपाशीच्या उत् पादनात आलेली मोठी घट, त्यामुळे  बरेच शेतकर्‍यांचा पिकाला लागलेला  खर्च निघाला नसल्यामुळे वैतागून काही शेतकर्‍यांनी  उभ्या कपाशीच्या शेतात  आजही मेंढरे घातल्याचे दृश्य दिसत आहे.

Farmers of Borchhed have four sheep in a vertical crop! | बोरखेड येथील शेतकर्‍यांनी उभ्या पिकात चारली मेंढरं!

बोरखेड येथील शेतकर्‍यांनी उभ्या पिकात चारली मेंढरं!

googlenewsNext
ठळक मुद्देकपाशीवर लाल बोंडअळीचे आक्रमण शेतकर्‍यांवर आर्थिक संकट

 लोकमत न्यूज नेटवर्क
बोरखेड : यावर्षी खरिपाचे उडीद, मूग सोयाबीनच्या पाठोपाठ कपाशीच्या उत् पादनात आलेली मोठी घट, त्यामुळे  बरेच शेतकर्‍यांचा पिकाला लागलेला  खर्च निघाला नसल्यामुळे वैतागून काही शेतकर्‍यांनी  उभ्या कपाशीच्या शेतात  आजही मेंढरे घातल्याचे दृश्य दिसत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील यंदा जास्तीत जास्त शेतकर्‍यांची खरिपाची  पिके  पेरणीयोग्य पाण्याअभावी उलटली. पुन्हा शेतकर्‍यांना व्याजाने पैसे काढून शेतात  दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अखेर पीक डोलत असताना सप्टेंबर  महिन्यात अचानकपणे रोज पहाटे धुके सतत आठ दिवस पडले व वातावरणा तील बदलामुळे उडीद, सोयाबीनच्या झाडांच्या शेंगा पोकळ राहिल्या. त्यामुळे ही  पिके तोट्यात गेली. त्यापाठोपाठ कपाशीची झाडे लाल होऊन पानराळ झाली.  त्यामुळे कमी वजनाचे बोंडे फुटू लागली. अशातच शेंदर्‍या अळीने मोठे  आक्रमण केले. त्यामुळे हे कपाशीचे पीक मजुरीलाही परवडणारे नसल्याने,  बोरखेड, वारखेड, दानापूर, बल्हाडी सोगोडा आदी गावात शेतकर्‍यांनी क पाशीच्या शेतात बरेच मेंढरे घातली. महसूल विभागाने अंतिम पीक आणेवारी  योग्य काढावी, शेतकर्‍यांनी काढलेल्या पीक विमा त्वरित मंजूर करून  शासकीय मदत मिळण्याची मागणी  जोर धरत आहे. 

शेतकरी हवालदिल
 वातावरणातील बदलामुळे शेतकर्‍यांवर वारंवार संकट कोसळत आहे. उडीद,  मूग, सोयाबीनपाठोपाठ आता कपाशीच्याही पिकावर संकट कोसळले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकटाचे सावट आणखी गडद होत असल्याचे  दिसून येते. पीक लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, शेतकरी हवालदिल  झाला आहे.

यंदा कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रसार तसेच शेंदर्‍या अळीने बोंड्यावर  केलेले आक्रमण त्यामुळे पीक  तोट्यात गेले. अखेर संतापून उभ्या कपाशीच्या  पिकात मेंढरे घातली. 
- मोहन बारब्दे, शेतकरी बोरखेड.

Web Title: Farmers of Borchhed have four sheep in a vertical crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.