सोमवारपासून शेतकरी जागर यात्रा; वर्धा येथे होणार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:39 AM2018-01-14T00:39:39+5:302018-01-14T00:49:34+5:30

बुलडाणा: ५0 वर्षांच्या कालावधीत हरितक्रांतीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर रासायनिक शेतीला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. त्यामुळे अनेक विपरीत परिणाम झाले असून, गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषदेच्यावतीने १५ जानेवारीपासून आहेरी ते वर्धा आणि मातृतीर्थ ते वर्धा अशी शेतकरी जागर यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

Farmer Jagar visit from Monday; Concluded that the execution will take place | सोमवारपासून शेतकरी जागर यात्रा; वर्धा येथे होणार समारोप

सोमवारपासून शेतकरी जागर यात्रा; वर्धा येथे होणार समारोप

Next
ठळक मुद्देमातृतिर्थातून होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ५0 वर्षांच्या कालावधीत हरितक्रांतीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर रासायनिक शेतीला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. त्यामुळे अनेक विपरीत परिणाम झाले असून, गोपालन करीत पारंपरिक सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषदेच्यावतीने १५ जानेवारीपासून आहेरी ते वर्धा आणि मातृतीर्थ ते वर्धा अशी शेतकरी जागर यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
यासंदर्भात भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी सेंद्रिय शेती करणारे यवतमाळ येथील राजेश्‍वर निवल, शेतकरी जागर यात्रा संयोजक अँड. अमोल अंधारे, राजेश पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार भवनाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. २६ जानेवारीला वर्धा येथे या दोन्ही यात्रांचा समारोप होणार आहे. त्यानुषंगाने मातृतीर्थ येथून निघणार्‍या यात्रेचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते १५ जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंद्रिय शेती करणारे यवतमाळ येथील राजेश्‍वर निवल हे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून नारायण महाराज शिंदे, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चिखली अर्बनचे सतीश गुप्त, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री सनद गुप्ता, शेतकरी यात्रा प्रमुख दिवाकर नेरकर, जिल्हा सेंद्रिय शेती कंपनीचे समाधान शिंगणे, उद्धव हिवराळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच गो संशोधक प्रा. हेमंत जांभेरकर उपस्थित राहतील. १५ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होईल. २,५५१ किमी प्रवास करून स्वदेशीचा मूलमंत्र देणारे महात्ता गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत या यात्रेचा समारोप होईल.

Web Title: Farmer Jagar visit from Monday; Concluded that the execution will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.