आॅनलाईन विक्री विरोधात औषध विक्रेत्याचा एल्गार

By admin | Published: May 27, 2017 07:40 PM2017-05-27T19:40:44+5:302017-05-27T19:40:44+5:30

राज्यातील ५० हजार औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसीय बंद पाळून निषेध नोंदविणार आहेत.

The drug seller's Elgar against online sales | आॅनलाईन विक्री विरोधात औषध विक्रेत्याचा एल्गार

आॅनलाईन विक्री विरोधात औषध विक्रेत्याचा एल्गार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : केंद्र सरकार आॅनलाईन औषध विक्रीस कायदेशीर मान्यता देण्याच्या दृष्टीने तयारी करीत असून शासनाने पब्लीक नोटीस जाहीर करून सूचना व मार्गदर्शन मागविले आहे. ई - पोर्टलद्वारे औषधे खरेदी विक्रीच्या धोरणाविरोधात देशभरातील ८.५० लक्ष तर राज्यातील ५० हजार औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसीय बंद पाळून निषेध नोंदविणार आहेत.
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व सर्व राज्याच्या संघटना तसेच जिल्हा संघटना व वैयक्तिक औषधी विक्रेता यांच्या माध्यमातून जवळपास ५० हजारापेक्षा जास्त हरकती व सुचना सरकारकडे दाखल करण्यात आल्या आहेत. औषध विक्रेता व व्यावसायिक फायदा तोटा फक्त याच भूमिकेतून या निवेदनाकडे सरकारने पाहु नये तर त्यावरील मुद्यावर गांभीर्याने विचार करण्यात यावा अशी रास्त अपेक्षा संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. जगातील अनेक प्रगत देशांनी आॅनलाईन फार्मसीचा विचार स्वीकारला नसून त्यामध्ये रशिया, जपान, इटली, चीन यासारख्या देशाचा समावेश आहे. ज्या देशांनी आॅनलाईन फार्मसीचा व्यवसायाला मान्यता दिली आहे अशा अनेक देशात सायबर क्राईममुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. आपल्या देशात पायाभूत सुविधा अखंड विद्युत पुरवठा, इंटरनेट कनेक्टीव्हीटी प्रशिक्षीत मनुष्यबळाचा अभाव, प्रशासकीय अधिकाऱ्याची उणीव, नागरिकांमध्ये व रुग्णामध्ये नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता यासारख्या उणीवामुळे रुग्णांना सेवा परिपूर्ण मिळणार नाही. त्याचप्रमाणे आज भारतात ८.५ लक्ष व महाराष्ट्रात असलेले ५० हजार केमीस्टचे भवितव्य अंधकारमय होईल. या सर्व बाबीचा विचार करता संघटनेने आॅनलाईन फार्मसीला विरोध म्हणून अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य केमीस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट असो.ने विरोध म्हणून ३० मे रोज मंगळवारला एक दिवसाचा बंद पाळण्याचे संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव अनिल नावंदर यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील औषध दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Web Title: The drug seller's Elgar against online sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.