नववर्षाच्या स्वागताला दारू नको, दूध प्या -  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:57 AM2017-12-30T00:57:31+5:302017-12-30T00:57:44+5:30

चिखली : ‘थर्टी फस्र्ट’ म्हटलं की दारूची पार्टी, हे जणू समीकरणच झालं आहे; मात्न दारु पिऊन झिंगलेल्या बेधुंद अवस्थेत नववर्षाचे स्वागत करण्याच्या कुप्रथेला फाटा देत स्वागत उत्साह आणि मंगलमय वातावरणात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दारू ऐवजी दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करण्याचे आवाहन दारुमुक्ती निर्धार परिषद व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने केले आहे.

Do not drink alcohol, do not drink milk, appeal to Hirakani women's Utkarsh Pratishthan | नववर्षाच्या स्वागताला दारू नको, दूध प्या -  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे आवाहन

नववर्षाच्या स्वागताला दारू नको, दूध प्या -  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देदारूमुक्ती निर्धार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : ‘थर्टी फस्र्ट’ म्हटलं की दारूची पार्टी, हे जणू समीकरणच झालं आहे; मात्न दारु पिऊन झिंगलेल्या बेधुंद अवस्थेत नववर्षाचे स्वागत करण्याच्या कुप्रथेला फाटा देत स्वागत उत्साह आणि मंगलमय वातावरणात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दारू ऐवजी दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करण्याचे आवाहन दारुमुक्ती निर्धार परिषद व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने केले आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करायचे, म्हणून ३१ डिसेंबर रोजी मन मानेल तितकी दारू प्यायची आणि मद्याच्या बेधुंदीत नवीन वर्षाचा सूर्य उगवत असताना, कुठेतरी लोळत पडायचे, हा नवीन प्रकार आजकाल सर्वदूर तरुणाईकडून केला जातो. वास्तविकत: नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात होणे अपेक्षित असताना युवा पिढी दारूच्या धुंदीत पडलेली दिसून येते. कधी नव्हे तो दारूची चव घेणाराही यामुळे भविष्यात व्यसनाधिनतेकडे झुकू शकतो, ही बाब टाळली गेली पाहिजे. यासाठी दारूमुक्ती निर्धार परिषदेचे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी दूध वाटपाचा कार्यक्रम राबविणार आहेत., तर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणनद्वारे दारूपासून परावृत्त करण्यासाठी ३0 व ३१ डिसेंबर रोजी पथनाट्याद्वारे तरुणाईचे लक्ष वेधल्या जात आहे.  ३१ डिसेंबर, गटारी अमावास्या यांसारख्या दिवशी राज्यात होणार्‍या दारू विक्रीचा आकडा सर्वोच्च आहे. नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप या निमित्ताने सर्व बंधने झुगारून तरुणांसह अनेक जण मनमुराद दारू पितात. एवढी की यादिवशी रात्रीपर्यंत दारू पिलेले अनेक लोक पाहाटे रस्त्याच्या कडेला, इकडे तिकडे, झिंगलेल्या अवस्थेत पडलेले दिसतात, हा नववर्षाचे स्वागत करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. 
तसेच ‘ट्रेंड’ म्हणूनही अनेक जण यानिमित्ताने दारूचा पहिला घोट घेतात आणि हळूहळू दारूच्या आहारी जावून आपले संपूर्ण आयुष्य बरबाद करून घेतात. हा प्रकार टाळावा, दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटूंब आणि कुटुंबियांची स्थिती नवीन तरुणाईची होऊ नये, यासाठी त्यांना दारूपासून परावृत्त करण्यासाठी दारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने यावर्षी विशेष प्रयत्न केल्या जात आहेत.  यानुषंगाने समुपदेशन करण्याचे कार्यदेखील दारू मुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने जिल्हा कार्यकारिणीसह सर्व सदस्य ३१ डिसेंबर रोजी करणार आहेत. 

पथनाट्याद्वारे जनजागृती
दारूमुक्तीसाठी आग्रही असलेल्या हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्यावतीने तरूणांनी दारूच्या आहारी जाऊ नये, यासाठी विविध माध्यमातून आवाहन करण्यासोबतच पथनाट्याच्या माध्यमातूनही उद्बोधन केले जात आहे.  या प्रयत्नाला सुजान नागरिकांनीही पाठबळ देऊन वैयक्तिक स्तरावर तरुणाईला दारूपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन हिरकणी प्रतिष्ठाणच्या वृषाली बोंद्रे व दारूमुक्ती निर्धार परिषदेचे नरेंद्र लांजेवार, रणजित राजपूत, गणेश वानखेडे, सुनीता भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योती ढोकणे, पंजाबराव गायकवाड, मंजितसिंग शीख यांनी केले आहे.

 

Web Title: Do not drink alcohol, do not drink milk, appeal to Hirakani women's Utkarsh Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.