CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू, ८४ पॉझिटीव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 06:25 PM2020-09-28T18:25:58+5:302020-09-28T18:26:05+5:30

 जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

CoronaVirus in Buldhana: Two more die, 84 positive | CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू, ८४ पॉझिटीव्ह 

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू, ८४ पॉझिटीव्ह 

Next

 बुलडाणा :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ८४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून  १९५ बाधीतांनी  कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार ८५४ वर पोहचली असून पाच हजार ६६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १ हजार १०१ रुग्णांवर विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.  
 प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी सोमवारी ३१४  अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २३० अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ८४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.तसेच  नांदुरा येथील ६५ वर्षीय पुरुष व वडजी ता. मलकापूर येथील ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.    पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये शेगाव शहर १३, शेगाव तालुका  पहूर जीरा १, कालवड १, नागझरी १, सवर्णा १,  नांदुरा शहर  ८, नांदुरा तालुका   खडतगाव १, संग्रामपूर तालुका   मंदारी १, कुलमखेड १, सिंदखेड राजा तालुका तांदुळवाडी १, मलकापूर शहर २ , मलकापूर तालुका   कुंड बु ३, चिखली तालुका   सवणा १, अन्वी १, कोलारा १, मेरा बू १,   चिखली शहर ९, जळगाव जामोद तालुका  वडशिंगी १,  बुलडाणा शहर ४, खामगाव शहर १४, खामगाव तालुका  गराड गाव २, बोर जवळा ५, घाटपुरी १, लोणार तालुका  पांगरा डोळे १, राजणी २, गोट्टा १,  लोणार शहर  १, दे. राजा शहर १, मेहकर शहर ३,   मुळ पत्ता वाझेगाव जि. अकोला येथील १  संशयीत रुग्णांचा समावेश आहे.  तसेच कोवीड केअर सेंटर  लोणार येथून १२  , मलकापूर येथून २१ , मेहकर १, जळगाव जामोद १३, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय ११, खामगाव ३१,  शेगाव ३३, सिंदखेड राजा २, मोताळा १२, चिखली ४१, दे. राजा ६, नांदुरा १४  रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.   आजपर्यंत २९ हजार ४५२  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ५ हजार ६६७  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    आजपर्यंत ८९२  नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.  जिल्ह्यात आज अखेर एकूण ६ हजार ८५४  कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ५ हजार ६६७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात १ हजार १०१ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ८६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी दिली आहे.

Web Title: CoronaVirus in Buldhana: Two more die, 84 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.