राज्यातील एक हजार गावात पोहोचली परिवर्तनाची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 05:50 PM2019-02-23T17:50:33+5:302019-02-23T17:50:41+5:30

धामणगाव बढे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश झाला असून राज्यातील २२ जिल्ह्यातील ८७ गावे आता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.

Changes in transformations in 1000 villages in the state | राज्यातील एक हजार गावात पोहोचली परिवर्तनाची घोडदौड

राज्यातील एक हजार गावात पोहोचली परिवर्तनाची घोडदौड

Next

-  नविन मोदे

धामणगाव बढे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश झाला असून राज्यातील २२ जिल्ह्यातील ८७ गावे आता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दायित्व निधी एकत्र करून राज्यातील दुर्गम भागातील खेड्यांना शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनची स्थापना २ एप्रिल १९१७ रोजी करण्यात आली होती. प्रारंभी १२ जिल्ह्यातील २४८ दुर्गम गावात हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. आता त्याची व्याप्ती एक हजार गावांपर्र्यंत पोहोचली आहे.
या अभियानामुळे राज्यातील दुर्गम भागातील सुमारे ३०० दुर्गम खेडी आज शाश्वत विकासाच्या मार्गावर आहेत. यात व्यक्ती केंद्रस्थानी मानत आरोग्य आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी परीपूर्ण प्रयत्न केले जातात. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड, चिखलीतील हरणी व करवंड आणि शेगावमधील सांगवा या गावांचा त्यात समावेश केला गेला आहे. पुढील आठवड्यात ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनतंर्गत येथील कामांना प्रारंभ होईल. आतापर्यंत अभियानाला मिळालेले यश पाहता महाराष्टÑ व्हिलेज सोशल ट्रान्समिशन फाऊंडेशन या नावाने रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. उद्योगपती रतन टाटा, अभिनेता अमिताभ बच्चन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रसिध्द व्यक्ती या अभियानाशी जोडल्या गेलेले आहेत. राज्यातील १७ मोठे उद्योगसमूह या उपक्रमास मदत करत असून ३५० ग्रामदूत तथा मोठे अधिकारी अभियानात पूर्णवेळ काम करत आहेत.

३०० खेडी परिवर्तनाच्या वाटेवर
अभियानातंर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी गट ग्रामपंचायतीतंर्गत चिंचोली, जांभळी वाडी, मेहरबान नाईक तांडा या दुर्गम गावाचा कायापालट झाला. सद्दाम खान सारख्या ग्रामदुताच्या परिश्रमावर, प्रशासनाच्या मदतीने शाश्वत विकासाकडे ही खेडी वाटचाल करत आहेत. सिंदखेड (प्रजा) गावाने वाटर कप स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. अभियानात गावाची निवड झाल्याने ग्रामस्थांचा उत्साह दुणावला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रविण कदम यांनी सांगितले.

Web Title: Changes in transformations in 1000 villages in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.