शंभरच्या नोटांद्वारे सोयाबीन खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 02:50 AM2016-11-14T02:50:57+5:302016-11-14T02:50:57+5:30

अडचणीपोटी शेतक-यांचा नाईलाज; व्यापा-यांकडून शेतकर्‍यांची लूट.

Buy soybean by a hundred notes! | शंभरच्या नोटांद्वारे सोयाबीन खरेदी!

शंभरच्या नोटांद्वारे सोयाबीन खरेदी!

Next

खामगाव, दि. १३- ऐन सोयाबीन विक्रीच्या काळात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गरजेपोटी सोयाबीन विकावे लागत असून, व्यापार्‍यांकडून शंभरच्या नोटांद्वारे प्रतिक्विंटल ४00 ते ५00 रुपये दराने कमी भाव मिळत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणले असता शेतकर्‍यांना शंभराच्या पूर्ण नोटा मिळत नाही. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत सद्यस्थिती शेतमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांना शंभराच्या नोटांसाठी थांबावे लागत आहे. त्यामुळे चेकद्वारे शेतकर्‍यांना सोयाबीन विक्रीची रक्कम अदा केली जात असल्याचे चित्र आहे. नेमके याच संधीचा फायदा घेत ग्रामीण भागात व्यापार्‍यांनी सोयाबीन खरेदीसाठी मोर्चा वळविला आहे.
शेतकर्‍यांना दैनंदिन खर्चाकरिता तसेच इतर रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी गहू, हरभरा, खते खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. सोयाबीन विक्रीशिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही. तेव्हा व्यापार्‍यांनी थेट गावात सोयाबीन खरेदी सुरु केली. शंभरच्या नोटा देऊन सोयाबीन खरेदी होत असताना क्विंटलमागे ४00 ते ५00 रुपये कमी दर व्यापार्‍यांकडून देण्यात येत आहे. एकप्रकारे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांजवळ पर्याय नसल्याने २000 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.

Web Title: Buy soybean by a hundred notes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.