बुलडाणा : पिंपळगांव देवी येथील जगदंबा माता यात्रोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:50 PM2017-12-29T13:50:28+5:302017-12-29T13:52:00+5:30

लिहा बु.: मोताळा तालुक्यातील लाखो भाविकांचे अराध्य दैवत असलेल्या पिंपळगांव देवी येथील जगदंबा मातेचा यात्रा महोत्सव येत्या पौष शुध्द पौर्णिमाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे.

Buldhana: Jagdamba Mata Yatra, preparations in Pimpalgaon Devi | बुलडाणा : पिंपळगांव देवी येथील जगदंबा माता यात्रोत्सवाची जय्यत तयारी

बुलडाणा : पिंपळगांव देवी येथील जगदंबा माता यात्रोत्सवाची जय्यत तयारी

googlenewsNext
ठळक मुद्देजगदंबा मातेचा यात्रा महोत्सव येत्या पौष शुध्द पौर्णिमाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे.जगदंबा मातेच्या मंदिर परिसरात यात्रा उत्सादरम्यान मोठ्या प्रमाणात हॉटेल, विविध साहित्यांचे शेकडो दुकाने येतात.भाविकांना व महिलांना यात्रेत खरेदी दरम्यान गर्दीचा व वाहतुकीचा त्रास होणार नाही, यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

लिहा बु.: मोताळा तालुक्यातील लाखो भाविकांचे अराध्य दैवत असलेल्या पिंपळगांव देवी येथील जगदंबा मातेचा यात्रा महोत्सव येत्या पौष शुध्द पौर्णिमाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक ग्रा.पं.प्रशासन व मंदिर विश्वस्त मंडळाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. जगदंबा मातेच्या मंदिर परिसरात यात्रा उत्सादरम्यान मोठ्या प्रमाणात हॉटेल, विविध साहित्यांचे शेकडो दुकाने येतात. या दुकान दारांन आपआपली दुकानी व्यवस्थीत थाटता यावीत यासाठी पिं.देवीचे सरपंच तेजराव पाटील यांनी यात्रा परिसरातील मोठ-मोठे खड्डे बूजविण्यास सुरूवात केली आहे. तसेच परिसरात गाजर गवत व काटेरी झाडे काढून जे.सी.बी.द्वारे सपाटीकरण करण्यात येत आहे. यात्रा महोत्सव जवळ आल्यामुळे तेजराव पाटील यांनी पांढºया चुन्याद्वारे संपूर्ण परिसरात आखणी करुन दुकानदारांकडून रस्त्यावरील अतिक्रमणास आळा बसून यात्रेत येणाºया भाविकांना व महिलांना यात्रेत खरेदी दरम्यान गर्दीचा व वाहतुकीचा त्रास होणार नाही, यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. यात्रेतुन जाणाºया जळगाव जिल्ह्यातील धामणगाव बढे कडील जाणाºया रस्त्यावर वाहतुक कोडी होणार नाही. तसेच वाहन धारक व वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रा.पं. व ग्रामसचिव शाहणे यांचे सहकार्य मिळत आहे. (वार्ताहर)

 मंदिराची रंगरंगोटी

मंदिर विश्वस्त यांनी जगदंबा मातेच्या मंदिरास रंगरंगोटी करुन, आकर्षक रोषणाई व मंदिर परिसरात येणाºया महिला व पुरुष भाविकांसाठी वेगवेगळी प्रसादन गृह उपलब्ध केली आहेत. तसेच महिला व पुरुषांसाठी पिण्याचे पाणी व दर्शनासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात येणार आहेत. तर मंदिर परिसरात पुष्पहार व नारळ व इतर पूजनाच्या वस्तुंचा इतर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. भाविकांना दर्शन कमी वेळेत सुलभ घेता यावे, यासाठी विशेष लक्ष विश्वस्तांकडून पुरविल्या जाणार आहे.

Web Title: Buldhana: Jagdamba Mata Yatra, preparations in Pimpalgaon Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.