बुलडाणा : अडचणीचे वृक्ष करताहेत शेतरस्ता अभियानाला मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 07:49 PM2018-01-09T19:49:23+5:302018-01-09T19:55:37+5:30

बुलडाणा : बुलडाणा महसुल विभागांतर्गत महिनाभरामध्ये तालुक्यात २८ शेतरस्ते निर्माण करण्यात आले आहेत. शेतरस्त्याच्यामध्ये  आलेले झाडे तोडल्यानंतर ती झाडे विकुन मिळालेल्या पैसेही रस्त्याच्याच कामासाठी लावले जात आहेत.

Buldana: Helping the campaign for the development of the tree! | बुलडाणा : अडचणीचे वृक्ष करताहेत शेतरस्ता अभियानाला मदत!

बुलडाणा : अडचणीचे वृक्ष करताहेत शेतरस्ता अभियानाला मदत!

googlenewsNext
ठळक मुद्देबुलडाणा महसूल विभागाने महिन्याभरात तयार केले २८ शेतरस्ते!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा महसुल विभागांतर्गत महिनाभरामध्ये तालुक्यात २८ शेतरस्ते निर्माण करण्यात आले आहेत. शेतरस्त्याच्यामध्ये  आलेले झाडे तोडल्यानंतर ती झाडे विकुन मिळालेल्या पैसेही रस्त्याच्याच कामासाठी लावले जात आहेत. त्यामुळे शेतरस्त्याच्या कामात अडचणीचे ठरणारे वृक्षच शेतरस्ता अभियानाला मदतकारक ठरत आहे.
शेतीला रस्ता नसेल तर शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतक-यांवर येते. त्यामुळे बुलडाणा महसुल मंडळांतर्गत लोकसहभागातून शेतरस्ते तयार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतू शेतरस्ता तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यास शेतकरी तयार नाहीत. काही ठिकाणच्या शेतरस्त्यावरच पेरणी होते. त्यामुळे अतिक्रमणात अडकलेले शेतरस्ते मोकळे करणे वादाचे ठरत आहे. परंतू लोकसहभागातून हे अभियाना हाती घेतल्याने शेतक-यांच्या सहभागाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जात आहे. बुलडाणा तालुक्यात तहसीलदार सुरेश बगळे व त्यांच्या पथकाने दररोज एक रस्ता पुर्ण करण्याचा धोरणच आखले आहे. त्यानुसार तालुक्यात अंमलबजावणी होत असून, दिवसाला एक रस्ता सध्या पूर्ण होत आहे. महिन्याभरात बुलडाणा तालुक्यात जवळपास २८ शेतरस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्याच्या मध्ये येणारे मोठ-मोठे वृक्ष तोडल्यानंतर त्याचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतरस्ता कामात आड येणारी वृक्ष तोडून त्याच्या विक्रीतून मिळणारा पैसा त्याच रस्त्याच्या कामासाठी लावला जात आहे. त्यामुळे शेतरस्त्याचा दर्जा सुधारण्यासही मदत होत आहे. लोकसहभागातून जमा झालेला निधी आणि वृक्षाचा निधी असा एकूण पैसा हा रस्त्याच्या कामासाठी लावला जात आहे. 

वृक्ष वाचविण्यासाठी धडपड
अतीक्रमणात अडकलेले शेतरस्ते मोकळे करणे व पायवाट बनलेले शेतरस्ते मोठे करण्यासाठी सध्या जिल्हाभर शेतरस्ता मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. या शेतरस्त्यातत येणारे वृक्ष वाचिवण्यासाठी प्रशासनासह शेतकरी धडपड करत आहेत. मोठ-मोठे वृक्ष न तोडताच रस्ता तयार केला जातो; मात्र अत्यंत अडचणीचे ठरणारे वृक्ष यामध्ये तोडल्या जातात. 

माळवंडी, येळगाव येथील रस्ता झाला मोकळा
बुलडाणा तालुक्यातील माळवंडी व येळगाव येथे शेतरस्त्याची मोठी अडचण होती. दरम्यान, ९ जानेवारीला माळवंडी व येळगाव या दोन्ही ठिकाणी शेतरस्ता कामाला तहसीलदार सुरेश बगळे यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या शेतरस्त्यासाठी लोकसहभागही उत्स्फुर्त वाढत आहे.
 

Web Title: Buldana: Helping the campaign for the development of the tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.