‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ साठी अंगणवाडी सेविका सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:06 PM2018-03-16T14:06:32+5:302018-03-16T14:06:32+5:30

मेहकर : मुलींचा जन्मदर वाढावा मुली जन्मासंदर्भात समाजामध्ये जन जागृती व्हावी, यासाठी तालुक्यातील अंजनी बु. येथील अंगणवाडी सेविकांनी गावामध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

Anganwadi worker persuaded beti bahao-beti padhao campaing | ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ साठी अंगणवाडी सेविका सरसावल्या

‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ साठी अंगणवाडी सेविका सरसावल्या

googlenewsNext
ठळक मुद्देमेहकर एकात्मिक बालविकास कार्यालय भाग-२ अंतर्गत ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या उपक्रमाची जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी अंगणवाडीतील मुलांची गावामधुन रॅली काढून जनजागृती केली. यामध्ये ‘बेटी बचाव, बेटी बचाओ’ या संदर्भात घोषणा दिल्या.

मेहकर : मुलींचा जन्मदर वाढावा मुली जन्मासंदर्भात समाजामध्ये जन जागृती व्हावी, यासाठी तालुक्यातील अंजनी बु. येथील अंगणवाडी सेविकांनी गावामध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गुरूवारला अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी अंगणवाडीतील मुलांची गावामधुन रॅली काढून जनजागृती केली.
आलीकडच्या काळामध्ये स्त्रीभृ्रण हत्या, महिलांवर अत्याचार, मुलींचा दर कमी होणे आदी प्रकारामध्ये वाढ झाली आहे. महिलांना संरक्षण मिळावे, समाजामध्ये मुलींना व महिलांना मानसन्मान मिळावा, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा उपक्रम शासनस्तरावरून राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन मेहकर एकात्मिक बालविकास कार्यालय भाग-२ अंतर्गत येणाºया अंजनी बु. येथील अंगणवाडी क्रमांक एक, पाच व सहाच्या सेविका व मदतनिस सुनिता पायघन, मंगला अंभोरे, कल्पना गायकवाड, लता चव्हाण, उज्ज्वला पद्मणे, सुमन टाकळकर, संगिता पायघन, पद्मा ढोरे, उमा अल्हाट, लिलाबाई अल्हाट, ज्योती नागोलकर, छाया खडसे, अश्विनी देशमुख, ज्योती संतोष नागोलकर, सिमा पवार, शोभा नितनवरे, अनुराधा टोनपे, विद्या पायघन, प्राची नितनवरे , तेजस्वीनी ढोरे, नंदीनी पारिस्कर आदी महिलांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या उपक्रमाची जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी गावामधून रॅली काढली. यामध्ये ‘बेटी बचाव, बेटी बचाओ’ या संदर्भात घोषणा दिल्या.  यावेळी गावातील महिलांची उपस्थित होत्या . 

Web Title: Anganwadi worker persuaded beti bahao-beti padhao campaing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.