बुलडाणा जिल्ह्यात तुरीनंतर हरभरा खरेदीचाही वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:38 AM2018-04-28T01:38:36+5:302018-04-28T01:38:36+5:30

बुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झाल्यामुळे शेतकºयांना आपला हरभरा व्यापाºयांना मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.

after tur pulses, problem to purchase harbara also in buldhana district! | बुलडाणा जिल्ह्यात तुरीनंतर हरभरा खरेदीचाही वांधा!

बुलडाणा जिल्ह्यात तुरीनंतर हरभरा खरेदीचाही वांधा!

Next
ठळक मुद्देनाफेड केंद्रावर हरभरा खरेदी बंदच मिळेल त्या भावात हरभरा विक्री!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झाल्यामुळे शेतक-यांना आपला हरभरा व्यापा-यांना मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.
शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाने हमीभाव जाहीर केला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत जिल्ह्यात हरभ-याची खरेदी करण्यास अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. जागेअभावी अनेक ठिकाणी नाफेडकडून हरभºयाची खरेदी सुरू न झाल्याने हरभरा उत्पादक शेतकºयांना खासगी व्यापाºयांना मिळेल त्या दराने आपला माल विकावा लागत आहे. नाफेड केंद्रांतर्गत अनेक वेळा जिल्ह्यात तूर खरेदी बंद झाली. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे सुरुवातीपासून हमीभावाने तूर खरेदी करण्याच्या प्रक्रियेला सर्वच केंद्रांवर ग्रहण लागल्याने शेतकरी आपला माल हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. आता तुरीपाठोपाठ हरभरा खरेदीला नाफेड केंद्रावर सुरुवात करण्यात आली आहे. हरभºयासाठी ४ हजार ४०० रुपये हमीभाव ठेवण्यात आला असून, आतापर्यंत हजारो शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभही करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात हरभरा खरेदीला सुरुवात होत नसल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी हरभºयाची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु अद्यापपर्यंत शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या लग्न समारंभ सुरू असल्याने अनेक शेतकºयांना पैशाची गरज भासते; परंतु नाफेड केंद्रावर नोंदणी करूनही हरभरा खरेदी होत नसल्याने नाइलाजाने शेतकºयांना आपला माल खासगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे. परिणामी शासनाने जाहीर केलेल्या ४ हजार ४००  रुपयांच्या भावापेक्षा एक ते दीड  हजार रुपये कमी दराने बाजारात हरभरा खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

घाटावरील हरभरा खरेदी अनियमित
घाटावरील तालुक्यातील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदीमध्ये अनियमितता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मेहकर येथील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदी सुरू करण्यात आली, तर सिंदखेडराजा तालुक्यातील नाफेड केंद्रावर २७ एप्रिल रोजी हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला; मात्र अद्यापही बुलडाणा, लोणार, चिखली, मोताळा व देऊळगावराजा येथील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदी बंद आहे. 

शुभारंभ नावालाच!
जिल्ह्यातील काही नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदीचा केवळ शुभारंभ झाला असून, खरेदी केंद्र प्रत्यक्षात बंद असल्याचे चित्र आहे. बुलडाणा येथील नाफेड केंद्रावर २० एप्रिल रोजी थाटात हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला; मात्र गेल्या आठ दिवसांपासून येथे हरभरा खरेदी करण्यात आली नाही, त्यामुळे हा शुभारंभ केवळ नवालाच उरल्याचे चित्र दिसून येत आहे.

जागेचा ठरतोय अडसर
नाफेड केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी जागेचा अभाव निर्माण होत असल्याने खरेदी केंद्र वारंवार बंद राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तुरीची खरेदीही जागेअभावी बंद करण्यात आली होती; आता पुन्हा हरभरा खरेदीसाठी जागेचा अडसर कळीचा मुद्दा बनत आहे. खरेदी झालेला माल साठविण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.

Web Title: after tur pulses, problem to purchase harbara also in buldhana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.