६५ स्वस्त धान्य दुकानदार धान्याच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:15 AM2017-08-19T00:15:50+5:302017-08-19T00:16:29+5:30

मेहकर: अन्नपुरवठा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मेहकर  शासकीय गोडावून अंतर्गत येणार्‍या जवळपास ६५ दुकानदारांना  अद्यापही मालाचे वितरण बाकी आहे. त्यामुळे पोळा सण अवघ्या  दोन दिवसांवर तर महालक्ष्मी सण आठवडाभरावर आला असताना  या दोन्ही महत्त्वाच्या सणाला अनेक गोरगरिबांना स्वस्त धान्या पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.  

65 cheaper wheat shopkeepers waiting for grains! | ६५ स्वस्त धान्य दुकानदार धान्याच्या प्रतीक्षेत!

६५ स्वस्त धान्य दुकानदार धान्याच्या प्रतीक्षेत!

Next
ठळक मुद्देपोळा, महालक्ष्मी सणाला गोरगरिबांवर अन्नधान्यापासून वंचित  राहण्याची वेळद्वारपोच योजनेच्या गाड्या बंद!तहसील विभागाकडून दिशाभूल करणारे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: अन्नपुरवठा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मेहकर  शासकीय गोडावून अंतर्गत येणार्‍या जवळपास ६५ दुकानदारांना  अद्यापही मालाचे वितरण बाकी आहे. त्यामुळे पोळा सण अवघ्या  दोन दिवसांवर तर महालक्ष्मी सण आठवडाभरावर आला असताना  या दोन्ही महत्त्वाच्या सणाला अनेक गोरगरिबांना स्वस्त धान्या पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.  
शहरी तथा ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, मजूर व  गोरगरीब नागरिकांसाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानामधून कमी  भावात गहू, तांदूळ, साखर आदी अन्नधान्य वाटप योजना सुरू  केलेली आहे.  सध्याची महागाई पाहता गरिबांसाठी स्वस्त धान्य  दुकानामधून मिळणारे हे अन्नधान्य  सणासुदीला वेळेवर मिळणे  फार महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यामध्ये हिंदू बांधवांचे नागपंचमी,  रक्षाबंधन, पोळा, महालक्ष्मी असे महत्त्वाचे सण येतात. दरम्यान,  नागपंचमी, रक्षाबंधन सणाला गोरगरिबांना स्वस्त धान्य माल  वेळेवर मिळालाच नाही. तसेच पोळा व महालक्ष्मी हे सण अवघ्या  काही दिवसांवर आले असतानाही मेहकर तालुक्यात अनेक गावा तील स्वस्त धान्य दुकानात माल अजूनही पोहचलाच नाही. मेहकर  येथील शासकीय धान्य गोदाम अंतर्गत जवळपास १३८ स्वस्त  धान्य दुकानदार आहेत. त्यापैकी १८ ऑगस्टच्या दुपारपर्यंत एकूण  ८३ दुकानदारांना मालाचे वितरण झालेले होते. त्यापैकी २५  दुकानदारांना मागील महिन्यात माल मिळाला नव्हता. त्या २५  दुकानदारांना या महिन्यात माल देण्यात आला आहे. तर या   महिन्यात  काही दुकानदारांना माल देण्यात आला असून, जवळ पास ६५ दुकानदारांना अद्याप स्वस्त धान्य मालाचे वितरण झालेले  नाही. सोमवारला पोळा सण असताना केवळ दोन दिवस बाकी  आहे. तर २७ ऑगस्ट ला महालक्ष्मी सण आहे. या सणाला  गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित राहणार असल्याचे चित्र दिसत  आहे. 

द्वारपोच योजनेच्या गाड्या बंद!
शासनाच्या द्वारपोच योजनेंतर्गत श्रीनाथ ट्रान्सपोर्टचे राजू गुप्ता  यांच्याकडे बुलडाणा जिल्हय़ाचे द्वारपोच योजनेचे कंत्राट आहे.  राजू गुप्ता यांनी मेहकर येथील विनोद मानधना यांना मेहकर  गोडाउनचा माल द्वारपोच देण्यासाठी वाहतूक प्रतिनिधी म्हणून  नोव्हेंबर २0१६ पासून नियुक्त केले होते. गेल्या दहा महिन्यापासून  वाहतूक प्रतिनिधी विनोद मानधना यांचे २५ लाख रुपये बिल राजू  गुप्ता यांच्याकडे थकीत असल्याने मानधना यांच्यावर उपासमारीची  वेळ आली असून, १ ऑगस्टपासून त्यांनी आपल्या गाड्या बंद  केल्या आहेत.  

तहसील विभागाकडून दिशाभूल करणारे पत्र
मेहकर गोडावूनमधून द्वारपोच योजनेंतर्गत अन्नधान्याचे वितरण  करण्यासाठी बुलडाणा जिल्हय़ाचे शासकीय वाहतूक कंत्राटदार  राजू गुप्ता यांनी मेहकर गोडाउनला विनोद मानधना यांना वाहतूक  प्रतिनिधी म्हणून नेमले होते. त्यामुळे विनोद मानधना यांचा मेहकर  अन्नपुरवठा कार्यालय व तहसील विभागाशी काहीही संबंध नस ताना तहसील विभागाने विनोद मानधना यांना वाहतूक ठेकेदार या  मथळ्याखाली दिशाभूल करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे जिल्हा  वाहतूक ठेकेदार, मेहकरचे अन्नपुरवठा कार्यालय तहसील विभाग,  मेहकर येथील शासकीय गोडाउन यांच्यामध्ये नियोजनाचा अभाव  असल्याचे दिसून येत आहे.

विनोद मानधना यांनी त्यांच्या गाड्या बंद केल्या असल्या तरीसुद्धा  गोरगरीब जनता अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी आमचे  प्रयत्न सुरू आहेत. सणासुदीला वेळेवर माल पोहचवून गरिबांना  त्याचा लाभ मिळेल. 
-ई.एफ.सैय्यद, अन्न पुरवठा अधिकारी, मेहकर.

जिल्हा वाहतूक कंत्राटदार राजू गुप्ता व मेहकरचे अन्नपुरवठा  अधिकारी यांनी माझे २५ लाख रुपये थकविल्याने माझ्यावर उ पासमारीची वेळ आली आहे.
-विनोद मानधना, वाहतूक प्रतिनिधी, मेहकर.

तत्कालीन वाहतूक ठेकेदार विनोद मानधना यांच्याकडे आमच्या  तीन वाहनांचे १ लाख २0 हजार रुपये थकीत आहेत. मानधना  यांच्या नियोजनाअभावी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी मानधना  यांच्या तीन गाड्या बंद केल्या आहेत. मानधना हे तहसीलदार व  अन्नपुरवठा अधिकार्‍यांवर विनाकारण खापर फोडत आहेत. 
- शेख लाल कुरेशी, वाहन मालक, मेहकर.

Web Title: 65 cheaper wheat shopkeepers waiting for grains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.