खाकीचा धाक संपतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:02 PM2018-06-20T12:02:36+5:302018-06-20T12:02:36+5:30

Is the threat of Khakri complete? | खाकीचा धाक संपतोय का?

खाकीचा धाक संपतोय का?

googlenewsNext

- देवेंद्र पाठक, धुळे़
पोलिसांची भूमिका संयमांची असतानाच आपला धाक संपवू देऊ नका, असे बोलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे़ खून, दरोड्यासारख्या घटनांनी कळस केला आहे़ शहरासह जिल्ह्यात घडणाºया मोठ्या घटनांना पायबंद घालत असताना पोलिसांना आपला धाक कायम ठेवावा लागणार आहे़ 
शहरासह जिल्ह्यात गुंडगिरीचे प्रमाण काही कमी नाही़ हातातून मोबाईल हिसकाविण्याच्या घटना घडत आहेत़ चहाच्या टपरीवर  बसून दोन - पाच पंटरांना गोळा करुन दादागिरी करणे, हॉटेलात फुकटात जेवण करणे या गावगुंडांवर आवर घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शहरातच नव्हेतर जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटना, घरफोडी, रस्तालुटीच्या घटना वाढल्या आहेत. त्याचाही छडा लावून चोरटयांना जेरबंद करण्याची गरज आहे.  शहरात अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे़ त्यांना सुध्दा वेळीच ठेचण्याची आवश्यकता आहे़ 
स्थानिक पोलिसांनी आपआपल्या भागात गस्त घालण्याच्या प्रमाणात वाढ करण्याची आवश्यकता आहे़ त्याचे प्रमाण रात्रीच्या वेळेस सर्वाधिक असायला हवे़ चोरी अथवा घरफोडीच्या घटनेतील संबंधित संशयितांवर पोलिसांचा कटाक्ष हवा़ त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा चोºया अथवा घरफोड्या होत असतील तर त्यांच्यावर कायम स्वरुपी वचक निर्माण करायला हवा़ पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी या बाबतीतील जिल्हास्तरीय आढावा घेवून संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे़ नागरीकांना सुध्दा सुरक्षिततेसाठी प्रबोधन कशा पध्दतीने होईल, यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे़ नागरीकांनी देखील स्वत:सह मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करायला हव्यात़ 
शहरातील संवेदनशिल आणि अतिसंवदेनशिल भागाकडे पोलिसांचे लक्ष असते, हे सर्वश्रृत आहे़ पण, त्याचवेळेस पोलिसांनी महाविद्यालयाकडेही तितक्याच गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे़ तरुणीच्या छेडखानीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ या प्रकाराला अंतच नसल्याचे समोर येत आहे़ आपण अगदी सुरक्षित आहोत, अशी भावना सर्वसामान्य नागरीकांमध्ये रुजविण्यासाठी पोलीस प्रशासनाला खूप मेहनत घ्यावी लागणार असल्याचे प्रतिबिंबीत होत आहे़ पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी पोलीस ठाण्यांचा अंतर्गत आढावा घेण्याची वेळ आली आहे़ यातून बºयाच बाबी प्रकर्षाने समोर येतील़ किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचा निपटारा झाला, याच्या आकडेवारीच्या पडताळणीची आवश्यकता निर्माण झाली आहे़ पोलिसांनी आपला धाक कायम ठेवल्यास गुन्हेगारीच्या प्रमाणात निश्चित घट होईल़ त्यासाठी ‘खाकीचा धाक’ कायम राहयला हवा, एवढेच! 

Web Title: Is the threat of Khakri complete?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.