औरंगाबाद शहर सुरू आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 08:30 PM2018-09-03T20:30:37+5:302018-09-03T20:31:20+5:30

उद्योग : औरंगाबाद शहर सुरू आहे ना?, नगर रोड सुरळीत आहे का?  तेथून पुढे जालन्याला जायला काही अडचण नाही ना? हे प्रश्न आहेत मुंबई, पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे. गेल्या नऊ ते दहा महिन्यांतील औरंगाबादमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे हे प्रश्न विचारले जात आहेत. 

Is Aurangabad city started? | औरंगाबाद शहर सुरू आहे का?

औरंगाबाद शहर सुरू आहे का?

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद शहराच्या दृष्टीने तसेच येथील औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असल्याचे मत उद्योग व्यवसायातील काहींनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. औरंगाबाद शहर गेल्या आठ महिन्यांत दंगल, जाळपोळ, बंद आणि वाळूज येथील ७० हून अधिक कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने  देशभर चर्चेत राहिले. या घटनांमुळे शहरात येण्यापूर्वी अन्य शहरांतील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि उद्योजकांकडून शहरात सर्व सुरळीत आहे का, अशी विचारणा होत आहे. मात्र या परिस्थितीचा आणि औरंगाबाद शहराबाहेरील व्यक्तींच्या मतांचा सुदैवाने औरंगाबादच्या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र शहराची ही प्रतिमा बदलण्याची गरज असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. गुंतवणूक, सुरक्षित पर्यटन आणि राहण्यासाठी उत्तम शहर, अशी आपली ओळख निर्माण करण्याची गरजही व्यक्त होत आहे. 

चालू वर्षाच्या प्रारंभीच दोन-तीन दिवस दगडफे क ीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आठ महिन्यांत थोड्या थोड्या कालावधीने दगडफेक, जाळपोळ, दंगल आणि बंदला शहरवासीय सामोरे गेले. वाळूज औद्योगिक  परिसरातील ९ आॅगस्ट रोजी बंदच्या दिवशी अनेक कं पन्यांमध्ये समाजकं टक ांनी धुडगूस घालून तोडफ ोड के ली. त्यामुळे या औद्योगिक नगरीतील उद्योजक  हादरून गेले. या दुर्दैवी घटनेची माहिती थेट देश-विदेशात पोहोचली. याचे परिणाम आता अनेक स्वरुपात समोर येत आहेत. बाहेरून शहरात येणाऱ्यांकडून विचारले जाणारे प्रश्न हा त्याचाच एक भाग आहे. जालना रोडवरून नगर रस्त्यावर जाण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. परंतु जालन्याहून पुण्याला जायचे असेल, शहरातील एखाद्या कंपनीला भेट द्यायची असेल तरीही औरंगाबादचे रस्ते सुरू आहेत का, असे येथील उद्योजकांना आधी विचारले जाते. मिळालेल्या उत्तरानंतरच औरंगाबादेत येण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे १०० ते १००० कि. मी. अंतरावरून येऊन औरंगाबाद परिसरात उद्योग सुरू करणारेही सुरक्षेच्या दृष्टीने विचार करीत आहेत. केवळ गेल्या आठ महिन्यांतील घटनांमुळे गुंतवणुकीसाठी हे शहर सुरक्षित आहे की नाही, अशीही चौकशी करीत असल्याची धक्कादायक माहिती समजते.

उद्योग सुरू करण्याची तयारी
हे सगळे असले तरी अद्याप औद्योगिक क्षेत्रावर कोणताही परिणाम झालेला नाही.  औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारामुळे आणि पायाभूत सुविधांमुळे जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होत आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी रुची दर्शवीत आहेत. त्यादृष्टीने अनेक कंपन्यांची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. शहराची निर्माण झालेली प्रतिमा बदलण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात पोलीस चौकी सुरू करून छोटेसे पाऊल पडले आहे. आगामी कालावधीत औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने आणखी नवीन धोरणात्मक निर्णय घेऊन शासन औद्योगिक शहराची प्रतिमा निश्चित उंचावणार, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. 

फोन, ई-मेलने विचारणा
शहरातील घटनांची माहिती असल्यास बाहेरून औरंगाबादेत येण्यापूर्वी फोन करून, ई- मेल करून ‘येणे सुरक्षित आहे का’ अशी विचारणा केली जाते. शहरात काहीही सुरू नाही, सर्व सुरळीत आहे, असे त्यांना सांगितले जाते. ही प्रतिमा बदलण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील. असे असले तरी  शहरातील गुंतवणूक हलविणार, अशी कोणतीही परिस्थिती नाही. शहरात पुढील पाच वर्षे काही घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. 
- राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए 

Web Title: Is Aurangabad city started?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.