दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:20 PM2018-06-29T22:20:19+5:302018-06-29T22:20:37+5:30

विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीची आमोरासामोर जोरदार धडक झाली. यात दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास गोबरवाही-चिचोली जंगल मार्गावर घडली. राजेश पुष्पतोडे (४०) रा.पाथरी, फहद जुनैद आजम (२३) रा.कामठी अशी जखमींची नावे आहेत.

Two seriously injured in a wheelchair | दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस पाटील गंभीर : चिचोली मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीची आमोरासामोर जोरदार धडक झाली. यात दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास गोबरवाही-चिचोली जंगल मार्गावर घडली. राजेश पुष्पतोडे (४०) रा.पाथरी, फहद जुनैद आजम (२३) रा.कामठी अशी जखमींची नावे आहेत.
पाथरीचे पोलीस पाटील राजेश पुष्पतोडे हे दुचाकी क्रमांक (एमएच ३६ सी १२२८) ने तुमसरकडे येत होते. तर चिचोलीकडून फहद आजम हा दुचाकी क्रमांक (एमएच ४० ए डब्लु ४३१७) ने गोबरवाहीकडे जात होता. दरम्यान, चिचोली-गोबरवाही मार्गावर फहद आजम हा व विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीला धडक दिला. त्यानंतर दोन्ही दुचाकी हवेत फेकल्या गेल्या. त्यानंतर ते दोघेही रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. दरम्यान, दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही दुचाकींचा चेंदामेंदा झाला. त्याच मागार्ने जाणाºया नागरिकांनी घटनास्थळावर थांबून गोबरवाही पोलिसांना माहिती दिली. रूग्णवाहिकेने जखमींना तुमसर रूग्णालयात हलविण्यात आले. प्राथकिम उपचारानंतर डॉक्टरांनी राजेश पुष्पतोडे यांना नागपूर तर फहद आजमला भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्याही डोक्याला मार लागला असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two seriously injured in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.