आदिवासींनी हक्क गाजवून केली धान कापणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:29 PM2017-11-23T23:29:14+5:302017-11-23T23:29:51+5:30

तुमसर तालुक्यातील धुटेरा येथे गैरआदिवासींनी आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या असून मागील काही वर्षापासून शेती करीत आहेत.

Tribal people cheated rice harvest | आदिवासींनी हक्क गाजवून केली धान कापणी

आदिवासींनी हक्क गाजवून केली धान कापणी

Next
ठळक मुद्देधुटेरा येथे तणाव : गैर आदिवासींनी बळकावली होती शेती

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील धुटेरा येथे गैरआदिवासींनी आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या असून मागील काही वर्षापासून शेती करीत आहेत. शासन व प्रशासनाचे येथे कायम दुर्लक्ष होते. आदिवासी गोंडवाना कृती संघर्ष समितीने बुधवारी धुटेरा येथे धान कापणी करून शेती ताब्यात घेतल्या. येथे संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या घटनेकडे अद्यापही दुर्लक्ष केले आहे.
धुटेरा येथे आदिवासी शेतकरी सुभाष टेकाम तथा अन्य आदिवासी बांधवांची शेती आहे, परंतु या शेतीत गैर आदिवासींनी धान शेती लावली आहे. आदिवासींचे हक्क येथे डावलले जात आहे. याबाबत आदिवासी गोंडवाना कृती संघर्ष समितीने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकाºयांना तक्रार दिली होती. परंतु कोणतीच दखल प्रशासनाने घेतली नाही. संघर्षाची स्थिती उद्भवणार म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस प्रशासनाला लेखी तक्रार संबंधिता विरोधात देण्यात आली.
बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत आदिवासी गोंडवाना कृती संघर्ष समितीतर्फे अनिल टेकाम, अशोक उईके, लक्ष्मीकांत उईके, दुर्गा परतेती, सुभाष धुर्वे, राजकुमार वाडीवे, हेमराज वरकडे, निळकंठ टेकाम, जयपाल टेकाम, साई उईके तथा शेकडो आदिवासी बांधवांनी धुटेरा येथे शेतजमिनीवर ताबा मिळवून धानाची कापणी केली. धान घरी नेले. येथे आदिवासी बांधवांनी शेतजमिनीवर ताबा मिळविला. गावात तणाव असून संघर्षाची स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाला लेखी माहिती दिल्यावरही कोणताच अधिकारी येथे दाखल झाले नाही.

तुमसर तालुक्यात गैरआदिवासींनी आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी बळकावल्याचा आरोप आदिवासी गोंंडवाना कृती संघर्ष समितीचे पदाधिकारी अनिल टेकाम यांनी केला आहे. आदिवासींच्या शेतजमीनीवर राजरोसपणे हक्क गाजवून सर्रास शेती घेणे येथे सुरू आहे. गैरआदिवासी येथे जिवे मारण्याची धमकी आदिवासी बांधवांना देत असल्याची तक्रार अनिल टेकाम यांनी केली आहे. येथे सदर प्रकरण चिघळण्याची शक्यता असून प्रशासनोन तात्काळ दखल घेण्याची गरज आहे.
 

Web Title: Tribal people cheated rice harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.