पेरणीचे बिघडले गणित

By admin | Published: June 26, 2014 11:06 PM2014-06-26T23:06:15+5:302014-06-26T23:06:15+5:30

आजचे हे गीत आपण सर्वांनी लहानपणी गायलेले आहे. पाऊस यावा म्हणून पावसाला पैशाचे आमीष दाखवायचे आणि पाऊस आल्यावर त्या पैशाला खोटेही करायचे. पावसाची गैरहजेरी पाहून आताही हे गीत गुणगुणावेसे वाटते.

Sowing math | पेरणीचे बिघडले गणित

पेरणीचे बिघडले गणित

Next

शेतकरी चिंताग्रस्त : पावसाची प्रतीक्षा
अड्याळ : ‘‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा
पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा’’
आजचे हे गीत आपण सर्वांनी लहानपणी गायलेले आहे. पाऊस यावा म्हणून पावसाला पैशाचे आमीष दाखवायचे आणि पाऊस आल्यावर त्या पैशाला खोटेही करायचे. पावसाची गैरहजेरी पाहून आताही हे गीत गुणगुणावेसे वाटते.
मृग नक्षत्र संपून आद्रा नक्षत्र सुरु झाले असून सुद्धा वरुण राजाची अपेक्षित तेवढी कृपा होत नसल्याने अड्याळ परिसरातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल् या आहेत. या वर्षी सुद्धा दुबार, तिबार पेरणी करावी लागणार की काय यामुळे बळीराजाच्या हदयाचे ठोके वाढले आहे. प्रतिक्षा मात्र पावसाची आहे.
मृग नक्षत्रात आलेल्या पिकांच्या पेरण्या वाढीच्या तसेच उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर असल्याने बळीराजा याच नक्षत्रात पिकांच्या पेरणीला प्राधान्य देत असतो. सध्या भंडारा जिल्हा म्हणजे भातावर भिडला म्हणजे धान उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतला जातो.
पेरणीपूर्व शेतीची मशागत करून तसेच जमिनीला खतावणी टाकून शेती पेरण्यायोग्य करण्यात आलेली आहे.
मात्र पाऊस येण्याची प्रतिक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळी हंगामाची सुरुवात ही शेती हंगामाची सुरुवात असते.
या वर्षीच्या शेती हंगामी वर्षाला ७ जून पासून सुरुवात झाली. मृग नक्षत्र प्रारंभी येत असल्याने या नक्षत्रात हमखास पावसाची हमी भोळा बळीराजा बाळगत असतो.
त्या दृष्टीने श्ेतकरी उन्हाळी हंगामाच्या समाप्तीपासून जमीनीच्या कामाला लागून पावसाळी हंगामाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असतो. २०१२-१३ मध्ये जे कष्ट, वेदना, आर्थिक भुर्दंड, दुबार तिबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढावले ते म्हणजे तोंडातला घास पळवून नेण्यासारखेच होते. अशा संकटाची टिकटिक डोक्यात आजही कायम आहे. परिणामी शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे.
यावर्षी पावसापूर्वी मशागतीच्या कामावर अखेरचा हात फिरवून पेरणीचे कामे सोपीे झाली होती. परंतु पाऊस न पडल्याने गणित चुकले असले तरी बळीराजाला आशा अपेक्षापलीकडे काही नाही आहे. त्यामुळे बळीराजाच्या डोक्यात पेरणीविषयी टिकटिक वाजते तर छातीत ठोक्याची धडधड वाढते. अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Sowing math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.