पात्र खोदून झऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:33 AM2019-06-06T01:33:11+5:302019-06-06T01:33:28+5:30

तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. सोमवारखेडा येथेही नदी-नाल्याच्या पात्रात झरे खोदून पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याशिवाय इतर मार्ग आदिवासींपुढे उपलब्ध नाही.

Search for fossils of character excavated | पात्र खोदून झऱ्यांचा शोध

पात्र खोदून झऱ्यांचा शोध

Next
ठळक मुद्दे५० गावांत भटकंती : चिखलदरा तालुक्यात १७ टँकर

चिखलदरा : तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. सोमवारखेडा येथेही नदी-नाल्याच्या पात्रात झरे खोदून पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याशिवाय इतर मार्ग आदिवासींपुढे उपलब्ध नाही.
तालुक्यात ५० पेक्षा अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींची वणवण सुरू असून, १७ टँकरने जवळपास ३० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने आदिवासींची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना पाण्याची पातळी खाली गेल्याने कोरड्या पडल्या आहेत. परिणामी टँकरचे दूषित पाणी आदिवासींच्या नशिबी आले आहे. पाण्यासाठी गावागावांत भांडणे सुरू असल्यामुळे टँकरने थेट विहिरीत पाणी सोडले जात आहे
नदी-नाल्यांत पाण्यासाठी भटकंती
पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींची गावशिवारावरील नदी-नाल्यात भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. नदी-नाल्यांच्या पात्रात खोदून झिरा (खड्डा) तयार करण्याची आदिवासींची जुनी पद्धत आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी अजूनही कुठून पाणी मिळते, याचा शोध आदिवासी घेत आहे. यासाठी आदिवासी चिमुकलेही पिण्याच्या पाण्यासाठी झरे करीत असल्याचे दृश्य सोमवारीखेडा येथे बुधवारी सकाळी पाहायला मिळाले.

Web Title: Search for fossils of character excavated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.