रोवणीसाठी पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:26 PM2019-07-15T23:26:12+5:302019-07-15T23:26:29+5:30

पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Release the water of the Pench and Bavanthadi Project for the plantation | रोवणीसाठी पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

रोवणीसाठी पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

Next
ठळक मुद्देधान उत्पादक चिंतातूर : पावसाने दडी मारल्याने पीक परिस्थिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांच्या शेतावर बारमाही सिंचनाची सोय नसल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनासाठी बावनथडी व पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबुन रहावे लागते. निसर्गाची अवकृपा आणि पावसाचा लहरीपणा यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर जलस्त्रात आहेत. त्या जलस्त्रोतातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
बळीराजा अजुनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतातील पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले परंतू बांध्यामध्ये पाण्याचा थेंब नाही. तसेच गाव तलाव व शेततळे अजूनही पावसाअभावी पूर्ण भरले नाहीत. त्यामुळे भात पिकाची रोवणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना दरवर्षी कर्ज काढावे लागते.
परंतू अस्मानी संकटामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात पाणी व पीक परिस्थिती गंभीर असली तरी संबंधित विभाग सुस्त आहे.कोणतीच उपाययोजना करित नसल्यामुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी पेंच व बावनथडी प्रकल्प अधिनस्त संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी आहे.
अधिनस्त संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन तसेच समन्वय साधुन तुमसर व मोहाडी तालुक्यातील भात पिकाच्या रोवणीसाठी बावनथडी व पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी राष्टÑवादीचे उपाध्यक्ष राजु कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हवामान खात्याचा अंदाज, शेतकरी चिंताग्रस्त
पालांदूर (चौ.) : चार महिन्यापैकी दीड महिना कोरडाच गेला. नदी-नाले प्रवाहीत झालेच नसल्याने धरती माता तहानलेलीच आहे. पावसाच्या विश्रांतीने पऱ्हे पिवळी पडत असून झालेली रोवणी सुध्दा धोक्यात आली आहे. हवामान खात्याने पुढचे पाच दिवस पाऊस येणार नसल्याचे भाकित वर्तविल्याने अन्नदाता चिंताग्रस्त झाला आहे. पावसाचा मुख्य नक्षत्रातील मृग व आद्रा अपेक्षित न बरसल्याने कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे. १९६२, १९७२, १९८७ वर्षाला दुष्काळ पडल्याची घटना आज आठवीत असून जाणकारांना धोका वाटत आहे. संपूर्ण जिल्ह्यात तलाव, जलसाठे कोरडे पडले आहेत. विहिरी, बोअरवेल संकटात सापडल्याने सिंचन क्षेत्रातील रोवणी सुध्दा सुकत आहेत. वीज सुरळीत मिळत नसल्याने सिचित क्षेत्र सुध्दा दुष्काळात येत आहे. चुलबंद खोऱ्यात १० टक्के रोवण्ी आटोपत आली आहे. कोरडवाहूच्या नर्सरी पिवळ्या पडत असून रोगराईच्या आधीन होत आहे. वरुण राजा बरसत नसल्याने उष्णता वाढली आहे. याचा परिणाम नक्कीच नकारात्मक रितीने हंगामावर अपेक्षीत आहे. ‘पाणी’ हे जीवन आहे. त्याची प्रचिती सर्वांना जाणवत आहे.जूनच्या शेवटच्या आठवड्यात ३ ते ४ दिवसाच्या पावसाच्या हजेरीने अन्नदात्याने पेरणीस घाई केली. याचा नकारात्मक परिणाम उगवणीवर झाला असून बऱ्याच नर्सरी धोक्यात आल्या. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. पुढील पाच ते सहा दिवस पावसाची विश्रांती चिंतेची वाटते. शेतकºयांनी पिकविमा उतरविणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीचे पऱ्हे संकटकालीन वेळी स्प्रेपंपाने पाणी फवारुन नर्सरी वाचवावी, असे तालुका कृषी अधिकारी लाखनी पद्माकर गिदमारे यांनी सांगितले.नेरला उपसा सिंचनातून लाखनी तालुक्याला पालांदूर परिसरात मागील वर्षी पाणी पुरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही पाणी नर्सरी जगविण्याकरिता पुरविण्यात यावे अशी मागणी मचरणाच्या सरपंच संगीता घोनमोडे यांनी केली आहे.

Web Title: Release the water of the Pench and Bavanthadi Project for the plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.