पुरी-इंदोर-पुरी साप्ताहिक गाडीचा गोंदियात थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:38 AM2018-06-10T01:38:40+5:302018-06-10T01:38:40+5:30

नागपूर-रायपूर रेल्वे मार्गावर महत्वाच्या ठिकाणी असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर पुरी-इंदोर-पुरी या साप्ताहिक रेल्वे गाडीचा थांबा देण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलीयार यांनी केली आहे.

Puri-Indore-Puri Stop the weekly train in Gondia | पुरी-इंदोर-पुरी साप्ताहिक गाडीचा गोंदियात थांबा द्या

पुरी-इंदोर-पुरी साप्ताहिक गाडीचा गोंदियात थांबा द्या

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे समितीची मागणी : मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर-रायपूर रेल्वे मार्गावर महत्वाच्या ठिकाणी असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर पुरी-इंदोर-पुरी या साप्ताहिक रेल्वे गाडीचा थांबा देण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलीयार यांनी केली आहे.
नागपूर-हावडा रेल्वे मार्गावर नागपूरनंतर दीड तासांच्या अंतराने येणारे गोंदिया रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील शेवटचे व महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरुन मोठ्या प्रमाणात प्रवांशाची ये-जा होते. महत्वाच्या कामासाठी प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकाचा वापर करतात. महाराष्ट्र तसेच लगतच्या मध्यप्रदेश या राज्यातील रेल्वे प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकावर पुढील प्रवासाठी येतात. गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या ब्राडगेजचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. त्या मार्गावरील प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकाचा वापर करता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफु ल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नाने अनेक महत्वाच्या जलदगती रेल्वेगाड्या गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबतात, तर काही थांबत नाही. पुरी-इंदोर-पुरी साप्ताहिक रेल्वे गाडीचा थांबा गोंदिया येथे दिल्यास प्रवाशांना खूप सोईचे होईल. प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलीयार यांनी ही मागणी केली आहे. थांबा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुदलीयार यांनी दिला असून त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे.

Web Title: Puri-Indore-Puri Stop the weekly train in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे