भंडारातील पक्के अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:08 PM2018-12-28T22:08:56+5:302018-12-28T22:09:24+5:30

शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत भंडारा पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊले उचलली. जिल्हा पषिरद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या एका बाजूचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले. विशेष म्हणजे सदर मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून या रस्त्याच्या बांधकामातील अडथळेही दूर झाले आहेत.

Poor encroachment in the Bhandara was destroyed by the police | भंडारातील पक्के अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले

भंडारातील पक्के अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक : अनेक अतिक्रमण भुईसपाट

लोकमत न्युज नेटवर्क
भंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत भंडारा पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊले उचलली. जिल्हा पषिरद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या एका बाजूचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले. विशेष म्हणजे सदर मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून या रस्त्याच्या बांधकामातील अडथळेही दूर झाले आहेत.
भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस पोलिस विभागाच्या संयुक्तपणे शहरातील राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण यापूर्वी काढण्यात आले होते. यात मात्र दुजाभाव केल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला होता. रस्त्याची मोजणी ते मार्किंगपर्यंतच्या कामात गौडबंगाल झाला, ही बाब नागरिकांनी खुलेआम बोलून दाखविली होती.
अतिक्रमण करणे हा गुन्हा असताना तर गरिबांचीच अतिक्रमणे पाडण्यात येतात. श्रीमतांना मोहिमेपासून का वगळण्यात येते, असाही युक्तीवाद फुटपाथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेच्या वेळी केला होता. सदर दुजाभाव न करताना नियमानुसार सर्वांचेच अतिक्रमण हटविण्यात यावेत, अशी मागणी होती.
यावर पालिकेने पुढाकार घेत शुक्रवारी कठोर भूमिका घेत सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरूवात केली. पाच फूटापर्यंत रेड मार्किंग केलेला भाग जेसीबीच्या सहायाने पाडण्यात आला. तणाव किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्ताची कमान भंडाराचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड यांनी स्वत: सांभाळली होती.
कुणालाही झुकते माप नको
शुक्रवारपासून आरंभ झालेला अतिक्रमण हटाव मोहीम इमाने इतबारे राबविली जावी, अशी चर्चा नेहमीच असायची. परंतु असे व्हायचे नाही. शुक्रवारी सुरू झालेली मोहीम खºया अर्थाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम ठरली. रस्त्याच्या मध्यभागापासून मोजमाप झालेल्या लाल मार्किंगपर्यंत असलेले सर्व अळथडे जेसीबीने तोडून टाकले. अशीच कारवाई रस्त्याच्या दुसºया बाजुने जेव्हा सुरू होईल तेव्हापण कुणालाही झुकते माप देवू नका, अशी चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यावरील पूर्णपणे निघाल्यावर त्याचे त्वरीतच बांधकामही सुरू होणार आहे. तद्वतच रस्त्याशी संबंधी असलेली नालीचेही बांधकाम केले जाणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा फौजफाटा पाहण्यासारखा होता. यावेळी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
च्वर्षभरातील पालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलनाची ही चवथी मोहीम होती. यापुर्वी शास्त्री चौक ते त्रिमुर्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र विद्यमान घडीला स्थिती जैसे थे आहे. मध्यंतरी या मोहीमेनंतर शहरातील गल्लीबोडीतही अतिक्रमण काढण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागल्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरीलही अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र अतिक्रमण हटावचा हा दरारा जास्त दिवस टिकू शकला नाही. निधीचा वाणवा व नियोजनाचा अभाव या दोन बाबींमुळे भंडारा शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा कायम तेवत आहे. याकडे सर्वांनीच सहकार्य व पुढाकार घेवून समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे.
वाहतूक बंद
सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना पालिकेने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. सकाळी १० वाजतापासून सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. परिणामी वाहतूक बंद असल्याने अनेकांना या मार्गावरील उपरस्त्यांचा आधार घ्यावा लागला. आता दुसºया बाजूकडे अतिक्रमण हटाव मोहिमेवर नागरिकांचे लक्ष लागले आहेत.

Web Title: Poor encroachment in the Bhandara was destroyed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.