पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:16 PM2017-08-16T23:16:12+5:302017-08-16T23:16:34+5:30

थील ज.मु. पटेल पटेल महाविद्यालयात युजीसी प्रायोजित व महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण विभागातर्फे

National seminar at Patel College | पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद

पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद

Next
ठळक मुद्देस्पोर्टस् बायो मेकॅनिक्स विषय : अमरावती विद्यापिठाच्या कुलगुरूंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील ज.मु. पटेल पटेल महाविद्यालयात युजीसी प्रायोजित व महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘स्पोर्टस बायो मेकॅनिक्स लेटेस्ट ट्रेन्डस अ‍ॅप्रोच अ‍ॅन्ड अप्लिकेशन’ या विषयावर राष्टÑीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसंवादाचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते पार पडले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी आपल्या देशात खेळाची संस्कृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. समाजाच्या आणि देशाच्या स्वास्थासाठी खेळाची भूमिका फार महत्वाची आहे, असे ते म्हणाले. विद्यापिठाकडून दिल्या जाणाºया वाढीव गुणांच्या पलिकडे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी खेळाला महत्व द्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
परिसंवादाला संबोधित करताना ज.मु. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी स्वागतपर भाषणातून, खेळ हा तणाव मुक्तीवर सर्वाेत्तम उपाय असल्याचे सांगितले. खेळात प्राविण्य व नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही यशस्वी होतात, असे त्यांनी नमुद केले.
एलएनआपीई ग्वालीयरच्या स्पोर्टस् बायोमेकानिक्सचे विभाग प्रमुख डॉ. अरविंद साजवान यांचे बिजभाषण झाले. आपल्या बिजभाषणात त्यांनी स्पोर्टस बायो मेकॅनिक्सच्या क्षेत्रातील बदलत्या विविध प्रवाहांचे विवेचन केले. तदवतच खेळाडूची प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी स्पोर्टस बायो मेकॅनिक्सची कशी आवश्यकता हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगितले. डॉ. कल्पना जाधव यांनी समयोचित विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अंनिलकुमार करवंदे आणि डॉ. माधवी मार्डीकर यांचीही यावेळी प्रभावी भाषणे झालीत.
परिंसंवादाच्या आयएसबीन क्रमांक असलेल्या शोधनिबंध स्मरणीकेचे व महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. विनी ढोमणे लिखित ‘स्वातंत्र्योत्तर हिंदी आत्मकथाओंमें सामाजिक मुल्य’ या पुस्तकाचे अतिथीच्या हस्ते विमोचन करण्यात आले. परिसंवादाचे संयोजक डॉ. बी.एस. पवार यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. रोमी बिश्त यांनी आभार प्रदर्शन केले. संचलन डॉ. उमेश बन्सोड, डॉ. अपर्णा यादव, डॉ. विणा महाजन यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. अमोल पदवाड डॉ. डी.एच. राऊत, डॉ. कार्तिक पनिकर, डॉ. प्रदिप मेश्राम, डॉ. आनंद मुळे, डॉ. सलिल बोरकर, डॉ. प्रकाश सिंग, प्रा. सिमा गोंडनाले, प्रा. शैलेश तिवारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Web Title: National seminar at Patel College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.