मध्य प्रदेश पंचायत राज संचालनालय चमूचा अभ्यास दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:13 PM2019-05-20T22:13:10+5:302019-05-20T22:13:34+5:30

पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा सरकार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हयातील काही ग्राम पंचायतींना भेट देऊन अभ्यास केला.

Madhya Pradesh Panchayat Raj Directorate Group Practice Tour | मध्य प्रदेश पंचायत राज संचालनालय चमूचा अभ्यास दौरा

मध्य प्रदेश पंचायत राज संचालनालय चमूचा अभ्यास दौरा

Next
ठळक मुद्देआपले सरकार सेवा प्रकल्पाचा अभ्यास : भंडारा जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम पंचायतींना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा सरकार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हयातील काही ग्राम पंचायतींना भेट देऊन अभ्यास केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांचे हस्ते अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या पंचायत राज संचालनालयाच्या संचालक उर्मिला शुक्ला व त्यांच्या चमूला ग्रामगिता व टोपी देऊन स्वागत केले. तसेच आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती दिली.
यावेळी अभ्यास दौऱ्यात प्रभारी संयुक्त तसेच उप महाप्रबंधक एस. के. नेमा, मुख्य कार्यकारी अधिकारी अवि प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कुमार यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत मालवीय, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पांडे, पंचायत समन्वय अधिकारी एच. एस. शुक्ला, ग्राम पंचायत सचिव आनंद गुप्ता, तर भंडारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, गट विकास अधिकारी नुतन सावंत, विस्तार अधिकारी प्रमोद हुमने, बोरकर, बोदेले, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले, पंचायत समिती भंडारा तालुका व्यवस्थापक राकेश ठोंबरे, सीएससी केंद्राचे व्यवस्थापक दुर्गेश भोंगाडे, आशिष चव्हाण, प्रवीण बांडेबुचे आदींची उपस्थिती होती.
भंडारा जिल्हयात सन २०१६ मध्ये आपले सरकार सेवा प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेले असून शासनाला आवश्यक असणारी माहिती, नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले आॅनलाईन द्वारे उपलब्ध करून या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजवणी करण्यात येत आहे.
नुकत्याच प्राप्त झालेल्या रँकींगमध्ये राज्यात भंडारा जिल्हयाला आपले सरकार सेवा प्रकल्पात तिसºया क्रमांकावर स्थान निर्माण झाले आहे. राज्यात असलेले भंडारा जिल्हयाचे उल्लेखनिय कार्य बघणे व अभ्यास करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारच्या पंचायतराज संचालनालयाच्या वतीने नुकताच भंडारा जिल्हयात अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौरा चमूचे प्रमूख तसेच पंचायत राज संचालनालयाच्या संचालक उर्मिला शुक्ला व त्यांचे चमूचे रविंद्र जगताप यांनी, सर्वप्रथम ग्रामगिता व टोपी भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर भंडारा जिल्हयात अंमलबजावणी करीत असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर जि टू सी मध्ये ११ अज्ञावली डॉटा एन्ट्रीचे कामे पूर्ण करणे, प्लॅन प्लस, प्रिया सॉप्ट, एरिया प्रोफाईल, एनपीपी, मिटींग मॅनेजमेंट, सोशिअल आॅडिट, रहिवासी दाखला, बिपीएल दाखला, उत्पनाचा दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट, जन्म मृत्यू व १ ते १९ प्रकारचे दाखले ग्रामस्थांना वितरीत करीत असल्याचे सांगितले.
ग्रामस्तरावरील आपले सेवा सरकार केंद्राचा अभ्यास व नागरिकांशी संवाद
भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या विविध सेवा व केंद्राचा अभ्यास करण्यासाठी भंडारा पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत गणेशपूर, शहापूर तसेच मोहाडी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत नेरी, बिड सितेपार व पाहूणी आदी ठिकाणी अभ्यास दौरा चमूने भेटी देवून पहाणी व अभ्यास केला. गणेशपूर येथे सरपंच मनिष गणवीर, सचिव श्याम बिलवने, केंद्रचालक विशाखा भिवगडे, शहापूर येथे सरपंच मोरेश्वर गजभिये, सचिव राजू महंत, केंद्रचालक वैशाली भूरे, नेरी येथे गट विकास अधिकारी वंजारी, विस्तार अधिकारी तेलमासरे, सरपंच आनंद मल्केवार, सचिव निरंजना खंडाळकर, तालुका व्यवस्थापक अवि बडवाईक, लेखीराम शेंडे, संजय हजारे, बिडसितेपार येथे सरपंच राजेश फुले, सचिव स्नेहा गिरीपुंजे, केंद्र चालक अंजू गोंडाणे, पाहुणीत सरपंच कल्पना मिराशे, सचिव वेणू बांगडकर, केंद्र चालक छोटूलाल मिराशे, ग्राम पंचायत पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Madhya Pradesh Panchayat Raj Directorate Group Practice Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.