बेला शाळेत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:45 PM2017-11-21T23:45:13+5:302017-11-21T23:46:20+5:30

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेला ही जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकीत शाळा ठरली आहे.

ISO standard certification distribution ceremony at Bela school | बेला शाळेत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा

बेला शाळेत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा

Next
ठळक मुद्देनवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार : शाळेत राबविले जातात नाविण्यपूर्ण उपक्रम, प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश

आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेला ही जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकीत शाळा ठरली आहे. याची घोषणा ५ सप्टेंबर २०१७ ला आयएसओ कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्या अनुशंगाने शाळेला सोमवारला आएसओचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा परिचय व सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात शारदा पूजन, स्वागत गीत व समूहगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच शारदा गायधने या होत्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गाढवे, गट शिक्षणाधिकारी विनोद चरपे, शिक्षण विस्तार अधिकारी कविता पाटील, केंद्र प्रमुख रमेश माने, केंद्र प्रमुख प्रदीप काटेखाये, विशेष अतिथी म्हणून आयएओ अधिकारी अतुल गोटे, आयएसओ अधिकारी राहुल मानवटकर, नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य, उपसरपंच अर्चना कांबळे, ओमप्रकाश ठवकर, कन्हैय्यालाल नागपूरे, मुख्याध्यापीका सरिता निमजे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राकेश फेंडर, अरुण गोंडाणे, रेखा भिवगडे, पंचफुला मेश्राम यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व परिचय करून देण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका सरिता निमजे यांनी केले. यावेळभ त्यांनी शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमाचा गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा सांगितला. गट शिक्षणाधिकारी विनोद चरपे, केंद्र प्रमुच रमेश माने, केंद्र प्रमुख प्रदीप काटेखाये यांनी समायोचित मार्गदर्शन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गाढवे यांनी, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. शाळेचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा करण्यासाठी शाळेला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन गाढवे यांनी यावेळी दिले. आयएसओ अधिकारी अतुल गोटे यांनी, शाळा समिती व शिक्षकांना अत्यंत महत्वाच्या सूचना दिल्या. गुणवत्तापुरक वातावरण शाळेत तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. शाळेत असणाऱ्या संसाधना विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. आयएसओ दर्जा प्राप्त केल्याबाबद सर्वांचे अभिनंदन केले. वेळोवेळी शाळेला मार्गदर्शन करण्याविषयी आश्वस्त केले.
अध्यक्षीय भाषणातून शारदा गायधने यांनी शाळा आयएसओ करण्यासाठी ग्रामपंचायतीने कार्य केलेल्या निधी तसेच वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्या विषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन अनिल शहारे यांनी केले. आभार प्रदर्शन लता निचत यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक संजय उपरीकर, शुद्धोधन बोरकर, रहिले, टिचकुले, वाडीभस्मे, किरण पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी रत्ना तितीरमारे, मंजू टांगले, अचल मेश्राम यांनी सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने व योग्य मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे डॉ. छगन खोब्रागडे, जयश्री मते, सुगंधा ढबाले, भावना सेलोकर, संगीता गजभिये, तबस्सूम खान यांनी सहकार्य दिले. आएसओ मानांकन शाळेला प्राप्त झाल्याने शाळेच्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याची जबाबदारी वाढली आहे. पालकांची उपस्थिती होती.

Web Title: ISO standard certification distribution ceremony at Bela school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.