दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले

By Admin | Published: May 24, 2017 12:19 AM2017-05-24T00:19:06+5:302017-05-24T00:19:06+5:30

चंद्रपूर जिल्ह्याकडे दारू पुरवठा करणाऱ्या टोळीला २३ मे च्या मध्यरात्री लाखांदूर पोलिसांनी हेरगिरी करून दोन वाहन ...

The illicit drug traffickers caught red handed | दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले

googlenewsNext

लाखांदूर पोलिसांची कारवाई : मुद्देमाल सह ६ लाख ९७ हजार रुपयांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : चंद्रपूर जिल्ह्याकडे दारू पुरवठा करणाऱ्या टोळीला २३ मे च्या मध्यरात्री लाखांदूर पोलिसांनी हेरगिरी करून दोन वाहन तालुक्यातील परसोडी-आसोला गावादरम्यान रंगेहात पकडले. यात दारूसह ६ लाख ९७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सचिन बालाजी रेफळवार (२५) रा.जभळापूर ता.सिंदेवाही, अमोल ब्रिजलाल जैस्वाल (२९) रा.गिरगाव ता.नागभीड, वैभव पुरुसोत्तम जगनाडे (२५) रा.मकरढोकडा ता. भंडारा, राहुल कांकरवार रा.सिंदेवाही, निखिल सुरेवर रा.सिंदेवाही अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहे.
पवनी व लाखांदूर तालुक्यातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा होत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी मिळाली होती.यामुळे अवैध दारू पुरवठा करणाऱ्यांवर जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलिस दारू पुरवठा करणाऱ्या टोळीवर शिकंजा कसायला सुरूवात केली आहे. याअंतर्गत कारवाईचे सत्र जोमात सुरू आहे. २३ मे रोजी गस्तीवर असतांना लाखांदूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. यावरून लाखांदूर पोलिसांनी परसोडी-आसोला दरम्यान चारचाकी क्र. एमएच ३६ एफ ५६४७ या गाडीची झडती घेतली असता यात देशी दारूचे ४८ पेट्या, किंमत १ लाख २४ हजार ८०० रुपये, तर ३ लाख रुपये किमतीचे वाहन पकडण्यात आले.
दुसरे चारचाकी वाहन एमएच ३१ - ९४३०, या वाहनांची झळती घेतली असल्यास त्यात २५ खरड्याच्या पेट्या किंमत ६५ हजार रुपये, व गाडी किंमत २ लाख रुपये, व ६ मोबाईल किंमत ७५०० रुपये असे मिळून ऐकून ६ लाख ९७ हजार ३०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सिकस यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक बबन रामदास फूसाटे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिपाई किशोर फुंडे, सचिन कापगते, नितीन बोरकर, राजेश पंचबुद्धे, प्रमोद चेतुले, अमितेशकुमार वडेटवर आदी कर्मचारी उपस्थित होते.
अवैध दारू पुरवठा करणाऱ्याचे आता धाबे दणाणले आहे. १५ दिवसातूनही दुसरी कारवाही असल्याने दारू पुरवठा करणाऱ्यांचे सिकांजे कसने सुरू केल्याने आता तरी यावर आळा बसणार अशी शक्यता आहे. तपास लाखांदूर पोलिस करीत आहेत.

Web Title: The illicit drug traffickers caught red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.