नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:04 PM2019-04-21T22:04:37+5:302019-04-21T22:05:08+5:30

जीवनदायीनी वैनगंगा व बावनथडी या प्रमुख नद्यांचे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धातच वाळवंट झाले आहे. दक्षिणी वाहिनी म्हणून ओळख असलेल्या नद्या कोरड्या पडल्याने भीषण जलसंकट निर्माण झाल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

Gruzing water on the river banks | नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी सोडण्याची गरज : वैनगंगा, बावनथडी नदीचे पात्र कोरडे

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जीवनदायीनी वैनगंगा व बावनथडी या प्रमुख नद्यांचे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धातच वाळवंट झाले आहे. दक्षिणी वाहिनी म्हणून ओळख असलेल्या नद्या कोरड्या पडल्याने भीषण जलसंकट निर्माण झाल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. एप्रिलच्या शेवटी नदीचा प्रवाह बंदची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांसह पशुधनाकरिता कवलेवाडा बॅरेज व बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची गरज आहे.
वैनगंगा व बावनथडी नदीचा उगम मध्य प्रदेशात झाला आहे. वैनगंगा नदीचा तुमसर, मोहाडी व भंडाा असा १०० किमीचा प्रवास आहे. तर बावनथडी नदी वैनगंगेत सामावते. बावनथडी नदीवर सीतेकसा येथे बावनथडी (राजीवनगर) धरण बांधण्यात आले तर वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी व धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरिता बॅरेज तयार करण्यात आले आहे.
दोन्ही नद्यांचे पाणी अडविल्याने वैनगंगा व बावनथडी नदीचा प्रवाह उन्हाळ्यात संथ होऊन पुढे तो प्रवाह बंद होतो. एप्रिल ते जून पर्यंत दोन्ही नद्यांचे मात्र वाळवंट बनते. दोन्ही मोठ्या नद्या असून त्यांचे विस्तीर्ण असे पात्र आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात वैनगंगा व बावनथडी नदी पात्र कोरडे पडले आहे. दोन्ही नदी पात्रातील काठावर किमान ४५ ते ५० गावांपेक्षा जास्त गावे आहेत. त्या गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पशुधनाची संख्या मोठी आहे.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
पाणी लवाद व केंद्रीय जलबोर्ड आयोगाने नदीतील वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्याचा उपयोग प्रथम पिण्याकरिता, सिंचनाकरिता व नंतर उद्योगाकरिता करावा असा नियम तयार केला आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यात प्रथम उद्योगाला प्राधान्य दिला तरी उन्हाळ्यात प्रथम पिण्याकरिता पाण्याचा विंसर्ग करण्याची गरज आहे.

नैसर्गिक स्रोत नाही
तुमसर तालुक्यात चांदपूर, बघेडा, कारली येथे मोठे तलाव आहेत. या व्यतिरिक्त पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. कवलेवाडा, बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा निसर्गाशिवाय येथे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. बावनथडी प्रकल्पात सध्या २५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर कवलेवाडा बॅरेजमध्ये मोठा जलसाठा उपलब्ध आहे.
प्रवाहाची निरंतरता
केंद्रीय जलबोर्ड आयोग तथा पर्यावरण विभागाने नदीवरील धरण तथा बॅरेज तयार झाल्यानंतर त्यातून पाण्याचा कायम विसर्ग सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वक्रदारातून सतत पाणी नदी पात्रात विसर्ग सुरु राहतो. परंतु त्याची गती व वक्रद्वार किती उंचीपर्यंत सुरु ठेवावा त्याची नियमावली आहे. प्रकल्पात अथवा बॅरेजमध्ये जलसाठा उपलब्ध राहून नदी प्रवाह बंद होऊ दिला जात नाही. याची खबरदारी संबंधित विभाग घेतो परंतु उन्हाळ्यात पाण्याचा मोठा उपयोग व सुर्याची दाहकता यामुळे पाण्याचा प्रवाह निश्चित बंद होतो.

Web Title: Gruzing water on the river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.