Ganesh Chaturthi 2018; भंडारा जिल्ह्यात २९७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:36 AM2018-09-13T11:36:44+5:302018-09-13T11:37:33+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे गुरुवारी वाजत गाजत आगमन होणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८७६ गावांपैकी तब्बल २९७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

Ganesh Chaturthi 2018; A village, a Ganapati in 297 villages in Bhandara district | Ganesh Chaturthi 2018; भंडारा जिल्ह्यात २९७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

Ganesh Chaturthi 2018; भंडारा जिल्ह्यात २९७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

googlenewsNext
ठळक मुद्दे३२५ सार्वजनिक गणेश मंडळगणपतीला घरी नेण्यासाठी लगबग सुरु

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे गुरुवारी वाजत गाजत आगमन होणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८७६ गावांपैकी तब्बल २९७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. तर जिल्ह्यात ३२५ तर भंडारा शहरात ५१ पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळ गणपतीची स्थापना करतील. गणेशोत्सवात एसआरपीसह स्थानिक पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.
भंडारा शहरासह जिल्ह्यातील जनता गणरायाला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी आतूर झाली आहेत. शहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, सहकार नगर, खात रोड मार्ग, शास्त्री वॉर्ड, मोठा बाजार परिसर यासह विविध ठिकाणी गणरायाच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. बुधवारीच अनेकांनी गणरायाच्या मूर्तींना आपल्या घरी नेले आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा जिल्ह्यातील २९७ गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गत काही वर्षांपासून या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात सुमारे ३२५ सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाणार आहे. तर घरगुती गणपतींची संख्या २८९० असल्याचे सांगण्यात आले. भंडारा शहरात भंडाराचा राजा, सन्मित्र गणेश मंडळाचा भंडाराचा राजा, बजरंग गणेश मंडळासह शहरात ५१ पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशाची स्थापना होणार.

Web Title: Ganesh Chaturthi 2018; A village, a Ganapati in 297 villages in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.