८०० दुचाकी चालकांना चार लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:03 AM2018-12-11T01:03:37+5:302018-12-11T01:04:09+5:30

जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ८०० पेक्षा अधिक दुचाकी चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून चार लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. यात १० पोलिसांसह २५ वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Four lacs penalty for 800 motorbike drivers | ८०० दुचाकी चालकांना चार लाखांचा दंड

८०० दुचाकी चालकांना चार लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देहेल्मेटसक्ती : २५ वकील आणि दहा पोलिसांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ८०० पेक्षा अधिक दुचाकी चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून चार लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. यात १० पोलिसांसह २५ वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. विना हेल्मेट दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्याची मोहीम सुरू करण्यात आली. गत आठवडाभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ८०० जणांना दंड ठोठावण्यात आला. दंडापोटी सुमारे चार लाख रूपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
सोमवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसमोर हेल्मेटबाबत कारवाई सुरू केली. त्यावेळी न्यायालयीन कामकाज करणारे १० पोलीस कर्मचारी, २५ वकील व न्यायालयीन कर्मचाºयांवर विनाहेल्मेट असल्याने दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून १७ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला.
सुरूवातीला नागरिकांना हेल्मेट सक्ती गैरसोयीची वाटत होती. परंतु आता दंडाच्या भीतीने आणि जनजागृतीमुळे बहुतांश नागरिक हेल्मेट वापर असल्याचे भंडारा शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली जात असून जीवन अमुल्य असल्याने प्रत्येकानेच दुचाकी चालविताना हेल्मेट घालावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

Web Title: Four lacs penalty for 800 motorbike drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.