अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:01 AM2018-08-17T01:01:26+5:302018-08-17T01:02:01+5:30

मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा कोंढा येथील राजू शिंगाडे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे.

Fasting to remove encroachment | अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देउपोषणकर्त्याची प्रकृती खालावली : कोंढा येथे महिन्यातभरात दुसऱ्यांदा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा कोंढा येथील राजू शिंगाडे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे राजू शिंगाडे यांना दुसºयांदा कोंढा ग्रामपंचायतसमोर कुटुंबीयांसोबत आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती तिसºया दिवशी खालावली आहे.
१३ आॅगस्टला ग्रामपंचायत कार्यालयासमोर राजु शिंगाडे आमरण उपोषणाला बसले आहेत. कोंढा येथे वडिलोपार्जित त्यांचे घर होते. ते मोडके असल्याने पडले. सध्या ते भाड्याने राहून मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने राजूला घरकुल मंजूर केले. मालकी हक्काच्या भूखंडवर घरकुल बांधण्यास सुरुवात केले. यासाठी रेती विटा आणले असता काहींनी रस्ता अडविला. घराला येण्याजाण्यासाठी दोन रस्ते आहेत. पण हे दोन्ही रस्ते अडविले आहे. गैरअर्जदार महादेव शिंगाडे, गोपीनाथ टेंभुर्णे यांनी तर रस्त्यावर पक्के विटा, सिमेंटचे काम केले असल्याने येण्याजाण्यास अडचण निर्माण झाली आहे. या संबंधात ग्रामपंचायत कोंढा, तहसीलदार, जिल्हाधिकारी भंडारा व पोलीस ठाणे अड्याळ यांना पत्र देऊन रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी केली. पण उपयोग झाला नाही. ग्राम पंचायत मोक्का समिती, तंटामुक्त ग्राम समिती यांनी मौक्यावर येऊन गैरअर्जदारांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिला. पण रस्ता मोकळा करुन देत नाही.
यापुर्वी १२ जुलैला ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले होते. तेव्हा ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी १३ जुलैला मालकी भूखंडला येण्याजाण्यासाठी असणारे दोन्ही रस्ते भूमी अभिलेख कार्यालय, पवनी तर्फे मोजमाप करुन अतिक्रमण असल्यास ते हटवून देण्याचे आश्वासन दिले. घरकुलाचे बांधकाम करतांना रस्ता कोणी अडविल्यास तो अडथळा दूर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने पहिले उपोषण १३ जुलैला मागे घेतले होते. मात्र महिणा लोटला असतानाही ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी रस्ता मोकळा दिला नाही. उलट धमकी दिली जात आहे. याउलट रमाई घरकुल बांधकाम अजूनपर्यंत सुरु केले नाही म्हणून नोटीस पाठविली आहे. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम तीन दिवसाच्या आत न केल्यास घरकुल रद्द करण्यात येईल, असे पत्र सरपंच ग्रामपंचायतने दिले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे हितसंबंध अतिक्रमणात गुंतले असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी १४ जुलैला मोका चौकशी केली. त्यानंतर भूखंड क्रमांक ११५ ची मोजणी करुन रस्त्याचे अतिक्रमण निघाल्यास उपोषणकर्ते राजु शिंगाडे यांचा रहदारीचा रस्ता दोन्ही बाजूनी मोकळा करुन दिला जाईल. मात्र उपोषणकर्ते राजु शिंगाडेनी उपोषण सोडून घरकुलाचे बांधकाम सुरु करावे.
डॉ. नुतन कुर्झेकर
सरपंच, ग्रामंचायत, कोंढा

Web Title: Fasting to remove encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.